आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या विळख्यात सेलेब्स:वरुण धवन, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांना कोरोनाची लागण, 'जुग-जुग जियो' चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वरुण धवन, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांचा कोरोना रिपोर्ट गुरुवारी संध्याकाळी आला आहे. मात्र यासंदर्भात चित्रपट निर्मात्यांनी अद्याप अधिकृत निवेदन जाहीर केलेले नाही.

‘जुग-जुग जियो’ या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या चंदीगडमध्ये सुरु आहे. मात्र आता चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. कारण सेटवर काही क्रू मेंबर्ससह चित्रपटातील कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. या चित्रपटातील मुख्य कलाकार वरुण धवन, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्यासह चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वृत्तानुसार, या चौघांचाही कोरोना टेस्टचा रिपोर्ट गुुरुवारी सायंकाळी आला आहे. मात्र अद्याप चित्रपटाच्या टीमकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

चित्रपटाशी निगडित सूत्रांचे म्हणणे आहे की सध्या शूटिंग थांबवण्यात आले आहे. आज संध्याकाळपर्यंत चित्रपटाच्या टीमकडून याबाबत अधिकृत विधान केले जाण्याची शक्यता आहे. अलीकडेचा अभिनेता आणि भाजपचे खासदार सनी देओल यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते. ते सध्या हिमाचल प्रदेशमध्ये असून येथे क्वारंटाइन आहेत.

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूरचा पहिला चित्रपट
यावर्षी 30 एप्रिल रोजी ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांचा 'जुग-जुग जियो' हा पहिला चित्रपट आहे. शूटसाठी रवाना होताना नीतू यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करताना लिहिले होते, "या कठीण काळातली माझी पहिली फ्लाइट. मी या प्रवासाबद्दल थोडी घाबरले आहे." पुढे त्यांनी ऋषी कपूर यांची आठवण करुन लिहिले, "कपूर साहेब, माझा हात धरायला तुम्ही इथे नाहीत, पण मला माहित आहे की तुम्ही कायम माझ्याबरोबर आहात."

'जुग-जुग जियो'मध्ये नीतू, वरुण आणि किआराशिवाय अनिल कपूर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'गुड न्यूज' फेम दिग्दर्शक राज मेहता करत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser