आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन रविवारी रात्री गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्नगाठीत अडकला. मुंबई नजीकच्या अलिबागमधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये दोघांचा लग्नसोहळा संपन्न झाला. लग्नानंतर वरुण आणि नताशा रिसॉर्टच्या बाहेर उभ्या असलेल्या छायाचित्रकारांना भेटायला आले. यावेळी पत्नी नताशासाठी वरुण फारच प्रोटेक्टिव दिसला.
झाले असे की, लग्नानंतर वरुण आणि नताशा रिसॉर्टच्या बाहेर येताच त्यांचे फोटो काढण्यासाठी प्रत्येकजण धडपडत होता. अनेकांनी नताशाला यावेळी 'वहिनी' म्हणून हाकही मारली. एवढंच नाही तर वरुण आणि नताशाने आपल्याच कॅमेऱ्याकडे पाहावे यासाठी प्रत्येक फोटोग्राफर ओरडत होता. यासाठी वरुण त्यांना गमतीने म्हणाला की, 'हळू बोला.. बिचारी घाबरेल..' विशेष म्हणजे फोटोग्राफर्सनीही वरुणची ही विनंती ऐकली.
ठरलेल्या मुहूर्तावर झाले नाही लग्न
वरुण आणि नताशा 24जानेवारीला सकाळच्या मुहूर्तावर लग्न करणार होते. पण दोघांना दुपारऐवजी संध्याकाळी लग्न करावे लागले. लग्नाला उशीर होण्याचे मुख्य कारण 23 जानेवारीला झालेली डीजे पार्टी.ही पार्टी मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. यामुळे दुसऱ्या दिवशीचे संपूर्ण वेळापत्रक बिघडले. याचमुळे सकाळच्या लग्नाच्या विधींनाही उशीर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वरुण-नताशाचे लग्न सकाळी होणार होते. पण लग्नाच्या विधींना दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात झाली. यानंतरही बॉलिवूड गाण्यांवर नाच- गाणे सुरू होते. हळदीनंतर संध्याकाळी नवरा मुलगा मंडपात येणार असल्याचं ठरलं. संध्याकाळी 7 वाजता वरुण मंडपात आला. यावेळी वरुण घोड्यावरून न येता Quad Bike वरून आला.
वरुण आणि नताशा यांच्या लग्नानंतर रात्री उशिरापर्यंत कॉकटेल पार्टी सुरू होती. लग्नाला करण जोहर, मनीष मल्होत्रा, अभिनेता आणि दिग्दर्शक कुणाल कोहली हे सेलेब्रिटी उपस्थित होते. याशिवाय त्यांच्या दोन्ही कुटुंबातील जवळचे नातेवाईकही लग्नाला सहभागी होते. कोरोना महामारीमुळे केवळ 40 पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.