आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॉकडाऊनमुळे बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांच्या रिलीज तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. देशभरातील थिएटर्स बंद झाल्यामुळे अनेक चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. दरम्यान, वरुण धवनने पोस्टपोन झालेल्या आपल्या 'कुली नंबर 1' चित्रपटाचे अपडेट आणले आहेत. अलीकडे वरुणने चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे, ज्यात मास्क लावलेल्या वरुणने नवीन ट्विस्टची हिंट दिली आहे.
'कुली नंबर 1' मध्ये राजूची भूमिका साकारणार्या वरुणने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये वरुण उर्फ राजू कुली मास्क लावून दिसतोय. यासह त्याने लिहिले की, 'कुली नंबर 1. आम्ही हसवायला येऊ, हे वचन आहे.' वरुणला मास्क लावलेला बघून, निर्माते चित्रपटामध्ये कोरोनाशी संबंधित कहाणी दाखवू शकतात, असा अंदाज काही लोकांनी वर्तवला आहे. हा फक्त एक अंदाज आहे कारण निर्मात्यांनी याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
View this post on Instagram😷 #coolieno1 हम आएंगे हसाने... ये वादा रहा
A post shared by Varun Dhawan (@varundvn) on Jun 11, 2020 at 1:04am PDT
या पोस्टरशिवाय वरुणने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये जावेद जाफरी, परेश रावल, राजपाल यादव आणि साहिल वेद या चित्रपटाच्या कलाकारांसोबतचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. यापूर्वी हा चित्रपट 2 मे रोजी प्रदर्शित होणार होता पण थिएटर बंद पडल्यामुळे आता 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
सारा अली खान आणि वरुण धवन स्टारर हा चित्रपट 1995 च्या ‘कुली नंबर 1’ या चित्रपटाचा रिमेक आहे. त्यात करिश्मा कपूर आणि गोविंद यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. कथेबरोबरच चित्रपटातील 'मैं तो रस्ते से जा रहा था' या गाण्याचा तडकाही या चित्रपटात आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती वाशू भगनानी आणि जॅकी भगनानी यांनी केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.