आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनलॉकिंग - 1:100 वर्षे जुन्या महामारीची छायाचित्रे शेअर करुन वरुण धवनने केले आवाहन, म्हणाला - आपल्याला आपली जबाबदारी समजून घ्यावी लागेल

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वीही जग या परिस्थितीतून गेले आहे.

अभिनेता वरुण धवनने 1920 साली पसरलेल्या महामारीची काही छायाचित्रे आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. या छायाचित्रांसह त्याने एक नोट लिहून देशवासीयांना आपली जबाबदारी समजून घेण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या चार टप्प्यांनंतर, देश अनलॉक होऊ लागला आहे आणि 1920 साली जशी परिस्थिती निर्माण झाली होती, तशी 100 वर्षानंतर 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झाली आहे. 

लोकसंख्येबद्दल लिहिले

वरुणने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे - 1920 आणि 2020. यापूर्वीही जग या परिस्थितीतून गेले आहे. आम्हाला आमच्या डॉक्टरांना, पोलिस दलाला आणि फ्रंट लाइन वॉरियर्सना मदत करायला हवी. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, जून 2020 पर्यंत भारताची लोकसंख्या 1,380,004,385 इतकी असणार आहे. भारताची लोकसंख्या जगातील एकूण लोकसंख्येच्या 17.7% इतकी आहे. अशा परिस्थितीत आपल्या सर्वांना आपली जबाबदारी समजून घ्यायला हवी.

1920 च्या महामारीबद्दल सांगायचे म्हणजे, स्पॅनिश फ्लूला 1918 फ्लू (साथीचा रोग) म्हणून ओळखले जाते. H1N1 इन्फ्लूएंझा एका विषाणूमुळे पसरलेला घातक साथीचा रोग होता. हा विषाणू फेब्रुवारी 1918 मध्ये पसरला होता आणि एप्रिल 1920 पर्यंत तो अस्तित्त्वात होता. त्यावेळी साथीच्या आजाराने 500 मिलियन लोकांना संक्रमित केले होते, हा आकडा त्याकाळातील जगातील संपूर्ण लोकसंख्येच्या एक तृतीयांश भाग होता. .

या महामारीमुळे झालेल्या मृत्यूची संख्या 100 मिलियनहून अधिक होती. हा आजार मानवी इतिहासामधील सर्वात प्राणघातक महामारी ठरला होता. कोरोनाप्रमाणेच हा व्हायरस तेव्हा पसरायचा जेव्हा एखाद्या संक्रमित व्यक्तीला शिंका येणे खोकला यायचा. प्रवास हे फ्लू जगभर पसरण्याचे मुख्य कारण होते.

वर्क फ्रंटवर वरुण धवन

वरुण धवनचा मागील रिलीज झालेला 'स्ट्रीट डांसर 3 डी'  हा चित्रपट होता. त्याचा पुढचा चित्रपट 'कुली नंबर वन' आहे, तो 1995 मध्ये या नावाने रिलीज झालेल्या  गोविंदा-करिश्मा कपूर स्टारर चित्रपटाचा रिमेक आहे. डेविड धवन यांनीच हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. रिमेकमध्ये सारा अली खान वरुणच्या अपोझिट दिसणार आहे. सुरुवातीला हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. याशिवाय तो सुनील खेत्रपालचा बायोपिक आणि करण जोहरच्या 'मिस्टर लेले' मध्येही दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...