आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वरुण-नताशाचा आशियाना:लग्नानंतर पत्नी नताशासह नवीन घरात शिफ्ट झाला वरुण धवन, सोशल मीडियावर व्हायरल होतोय घराचा व्हिडिओ

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वरुण धवन पत्नी नताशा दलालसमवेत आपल्या नवीन घरात शिफ्ट झाला आहे.

अभिनेता वरुण धवनने 24 डिसेंबर रोजी बालपणीची मैत्रीण नताशा दलालसोबत लग्नाच्या बेडीत अडकला. अलिबागच्या द मॅन्शन हाऊस या आलिशान रिसॉर्टमध्ये दोघांचा शाही लग्नसोहळा पार पडला. वरुण-नताशाच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले होते.

आता लग्नानंतर वरुण-नताशा हे नवविवाहित जोडपं त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत वरुणने लग्नानंतर नताशाबरोबर स्वतःच्या नवीन घरात शिफ्ट होणार असल्याचे सांगितले होते.

हे घर वरुणने 2017 मध्ये खरेदी केले होते. त्यावेळी अभिनेते अनुपम खेर यांनी वरुणच्या या नवीन घराचा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केला होता. ज्यामध्ये वरुणने लिव्हिंग रुम, बेडरुम, वर्क डेन, क्लोसेट आणि गेस्टरुमची सफर घडवली होती. वरुणच्या घराचा जेव्हा गृहप्रवेश झाला होता, त्यावेळी अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ शूट केला होता. हा व्हिडिओ शेअर करताना अनुपम खेर यांनी लिहिले होते की, 'वरुण धवनने त्याचे नवीन घर दाखवले. त्याला मी लहानपणापासून ओळखतो, जेव्हा त्याचे वडील वेस्पा स्कुटरवर फिरायचे. त्यांच्या कष्टाचे मोल झाले आहे.'

मिळालेल्या माहितीनुसार, वरुणचे हे नवीन घर त्याच्या आई-वडिलांच्या घराजवळच आहे. नताशाने आपल्या आवडीने आपले घर सजवले आहे. वरुणच्या आवडीचा देखील यामध्ये विचार करण्यात आला.