आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमधून सुशांतसाठी न्यायाची मागणी:कंगना रनोट, अंकिता लोखंडेनंतर आता वरुण धवन, सूरज पांचोलीसह यांनी केली सीबीआय चौकशीची मागणी, म्हणाले - 'खरं जगाला जाणून घ्यायचे आहे'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूड कलाकारांनी सीबीआय चौकशीच्या मागणीला आपला पाठिंबा दिला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या प्रकरणी अनेक स्तरातून सीबीआय चौकशीची मागणी होत आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी धरुन लावली आहे. त्यांना सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिनेदेखील आपला पाठिंबा दिला आहे. अभिनेत्री कंगना रनोटनेदेखील या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. एवढ्या दिवसांनी आता बॉलिवूडमधील अनेक कलाकार सुशांतला न्याय मिळावा यासाठी पुढे आले आहेत. अभिनेता वरुण धवन, सुरज पांचोली, मौनी रॉय, परिणीती चोप्रा, क्रिती सेनॉन यांनी सुशांतला न्याय मिळावा, यासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे.

वरुण धवनने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर #cbiforsushant असा हॅशटॅग वापरत सीबीआय चौकशीला पाठिंबा दिला.

अभिनेता वरुण धवनने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट टाकली.
अभिनेता वरुण धवनने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट टाकली.

सुरज पांचोलीने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये खरं जगाला जाणून घ्यायचं आहे. सूशांतला न्याय मिळायला हवं, असं मत व्यक्त केले आहे.

अभिनेता सूरज पांचोलीची इंस्टाग्राम स्टोरीवरील पोस्ट
अभिनेता सूरज पांचोलीची इंस्टाग्राम स्टोरीवरील पोस्ट

सत्य लवकरात लवकर बाहेर यावे यासाठी मी प्रार्थना करतेय, असे क्रिती सेनॉन म्हणाली आहे.

क्रिती सेनॉनची पोस्ट
क्रिती सेनॉनची पोस्ट

अभिनेत्री परिणीती चोप्राने देखील इंस्टाग्रावरील आपल्या पोस्टमध्ये सत्य बाहेर यायला हवे. सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळायला हवा, असे म्हटले आहे. यावेळी तिने #JusticeForSSR असा हॅशटॅग वापरला. तर अभिनेत्री मौनी रॉय हिनेदेखील #CBIforSushantSinghRajput असे आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.

परिणीती चोप्राची इंस्टाग्राम स्टोरीवरील पोस्ट
परिणीती चोप्राची इंस्टाग्राम स्टोरीवरील पोस्ट

अभिनेत्री कंगना रनोट सुरुवातीपासूनच सुशांतला न्याय मिळावा यासाठी पुढे आली आहे.

अभिनेत्री झरीन खान हिनेदेखील सगळ्यांना सत्य जाणून घ्यायचा अधिकार सांगून सीबीआय चौकशीच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

यापूर्वी सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंहने गुरुवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करुन सगळ्यांनी सीबीआय चौकशीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. व्हिडिओमध्ये ती म्हणाली की, 'मी तुम्हाला एक विनंती करते की सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र यावे आणि या केससाठी सर्वांनी एकजूट होऊन सीबीआय चौकशीची मागणी करावी. आम्हाला सत्यता जाणून घ्यायची आहे आणि हे सत्य जाणून घेण्याचा आमचा अधिकार आहे. जर असे नाही झाले तर आम्ही सत्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आम्ही शांतीपूर्ण जीवन जगू शकणार नाही.' श्वेताने आपला हा व्हिडिओ पंतप्रधान कार्यालय, पीएम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनादेखील टॅग केला आहे.

अंकिता लोखंडेने श्वेताचा हा व्हिडिओ शेअर करुन तिला आपला पाठिंबा दिला. सोबतच स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करुन 'सुशांतसोबत नेमकं काय घडलं? हे संपूर्ण देशाला जाणून घ्यायचं आहे. सुशांतची केस CBI कडे सोपवावी. #CBI for SSR” अशी मागणी तिने केली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता जवळपास दोन महिने होत आले आहेत. मुंबई पोलिस, बिहार पोलिस आणि ईडीमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी आता सीबीआयकडे सोपवण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...