आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेटवर परतले कलाकार:शूटिंगपूर्वी वरुण धवनने केली कोरोना चाचणी, या महिन्यात सुरु होतंय अभिषेकच्या 'द बिग बुल'चे शूटिंग

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्टोबरमध्ये सुरु होईल अभिषेक-इलियानाच्या चित्रपटाचे शूटिंग

अनेक मोठे कलाकार सेटवर परतल्यानंतर आता अभिनेता वरुण धवननेही आपले काम सुरू केले आहे. नुकतेच त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो कोविड टेस्ट करून घेत असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच वरुणने तपासणी दरम्यान घेतलेले काही फोटोही शेअर केले आहेत.

यावर त्याने लिहिले, “मी पूर्ण सावधगिरीने कामावर परत येत आहे. दाेन फुटाचे अंतर आणि मास्क गरजेचे आहे, असे त्याने लिहिले आहे. मात्र वरुणने नेमके काय शूट करणार आहे, याचा खुलासा केला नाही. त्याचा आगामी ‘कुली नंबर 1’चे शूटिंग पूर्ण झाले आहे. सध्या त्याच्याकडे “तख्त”, “मिस्टर लेले” आणि “रणभूमी” सारखे चित्रपट आहेत.

ऑक्टोबरमध्ये सुरु होईल अभिषेक-इलियानाच्या चित्रपटाचे शूटिंग

अभिषेक बच्चन आणि इलियाना डिक्रूझ अभिनीत “द बिग बुल”चे निर्माते पुन्हा शूटिंगच्या तयारीत आहेत. ऑक्टोबरमध्ये याचे फायनल शूटिंग सुरू होणार आहे. काेरोनामुळे आम्ही बरीच खबरदारी घेत आहोत. जागोजागी सॅनिटायझर ठेवलेे जाईल आणि मास्क घातलेले कर्मचारी सेटवर फिरतील. सरकारने जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करणार आहोत, असे निर्मात्यांनी सांगितले आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे, ज्याची निर्मिती अजय देवगन आणि आनंद पंडित यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...