आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवॉर्ड:अभिनेता वरुण धवनला लग्नानंतर मिळणार आहे पहिला 'बेस्ट अ‍ॅक्टर'चा पुरस्कार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वरुणला हा अवॉर्ड 'स्ट्रीट डान्सर 3' या चित्रपटातील अभिनयासाठी मिळणार आहे.

अभिनेता वरुण धवनने 24 जानेवारी रोजी त्याची बालमैत्रीण नताशा दलालसोबत लग्न थाटले. चाहत्यांमध्ये त्याच्या लग्नाची बरीच चर्चा झाली. त्याच्या लग्नाला काहीच दिवस झाले असून आता वरुणच्या चाहत्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आली आहे. लवकरच वरुणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारने सन्मानित करणार असल्याचे ऐकिवात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या पुरस्काराच्या शर्यतीत बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते रणवीर सिंग आणि सलमान खान यांच्याही नावांचा समावेश होता. मात्र बाजी वरुण धवनने मारली. वरुणची लहान मुलांमध्ये प्रचंड क्रेझ असल्याची बघायला मिळते.

'स्ट्रीट डान्सर 3' साठी मिळणार पुरस्कार
प्रतिभावान अभिनेता असलेल्या वरुणला कायमच लहान मुलांसोबत वेळ घालवायला आवडतं. वरुण मागील चार वर्षांपासून लहानग्यांना आवडतील असे चित्रपट करतोय. त्यामुळे तो मुलांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे.

त्याच्या स्टायलिश आउटफिट्सपासून ते डान्स सीक्वेन्सपर्यंत वरुण मुलांसाठी अवॉर्ड शो मनोरंजक करण्यासाठी ओळखला जातो. वरुणला हा अवॉर्ड 'स्ट्रीट डान्सर 3' या चित्रपटातील अभिनयासाठी मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...