आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अक्षय कुमारचे ‘सूर्यवंशी’ आणि ‘बेल बॉटम’ हे दोन चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत. यापूर्वी ‘बेल बॉटम’ 2 एप्रिल रोजी रिलीज होण्याची बातमी होती, पण आता हा चित्रपट थिएटरमध्ये लागणार नाही, अशी चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निर्माते जॅकी आणि वासू भगनानी अॅमेझॉन प्राइमशी सतत संपर्कात आहेत. सर्व काही ठीक राहिल्यास अक्षयचा चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो.
वरुण धवन 24 जानेवारीला अलिबागमध्ये नताशा दलालसोबत लग्न करणार आहे. लग्नानंतर काही दिवसांतच तो आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. फेब्रुवारीमध्ये तो कृती सेनॉनसह 'भेडिया' या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 'भेडिया' हा अमर कौशिकचा चित्रपट आहे. त्याचे चित्रीकरण अरुणाचल प्रदेशमध्ये होणार आहे. हे दोन महिन्यांचे वेळापत्रक असेल. रिअल लोकेशनवर शूट केले जाणार आहे.
गुरुवारी अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह यांच्या आगामी 'थँक गॉड' या चित्रपटाचा मुहूर्त झाला. चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू झाले आहे. या विनोदी चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. दिग्दर्शन इंद्रकुमार यांचे आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त अजय सध्या 'मैदान', 'मे डे', 'भुजः द प्राइड ऑफ इंडिया' आणि राजामौलींच्या 'आरआरआर' या चित्रपटांमध्येही व्यस्त आहे.
Lights. Camera. Action. 📷🎥
— Ajay Devgn (@ajaydevgn) January 21, 2021
The shoot for #ThankGod begins today in Mumbai! @SidMalhotra @Rakulpreet @Indra_kumar_9 #BhushanKumar #KrishanKumar #AshokThakeria @SunirKheterpal @DeepakMukut @MunnangiBalu @anandpandit63 #MarkandAdhikari #YashShah @TSeries pic.twitter.com/yT6TAjqbdH
अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांनी 2018 मध्ये पहिल्यांदाच ‘मनमर्जियां’मध्ये एकत्र काम केले होते. हा चित्रपटही मोठा गाजला होता. आता दोघे पुन्हा एकत्र येणार आहेत. अनुराग आणि तापसी लवकरच साय-फाय चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहेत. सुरुवातीला थायलंड आणि मॉरिशसमध्ये या चित्रपटाचे शूटिंग होणार होते. पण आता अनुरागने गोव्यात शूटिंग करण्याचे ठरवले आहे. गोव्यात या चित्रपटाचे शूटिंग तीन आठवड्यांपर्यंत सुरू राहील. अनुरागला या चित्रपटात समुद्रकिनाऱ्यावरील दृश्य हवे होते. त्यामुळे त्याने आपले नियोजन बदलले.
अभिनेत्री मृणाल ठाकूरचे सध्या बरेच प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे तिने काही चित्रपट नाकारले आहेत. त्यामुळेच मृणाल आयुष्मान खुराणाच्या ‘डॉक्टर जी’ चित्रपटात दिसणार नसल्याचे वृत्त आहे. यामागचे कारण तिच्याकडे तारखा नसल्याचे सांगितले जात आहे. तिने इतर चित्रपटांना यापूर्वी तारखा दिल्या आहेत. लॉकडाऊनच्या अगोदर मृणालने शाहिद कपूरचा स्पोर्ट्स ड्रामा ‘जर्सी’, फरहान अख्तरचा चित्रपट ‘तूफान’ आणि ईशान खट्टरचा चित्रपट ‘पिप्पा’साठी तारखा दिल्या आहेत. शिवाय मृणाल शरमन जोशीसोबतही ‘आँख मीचौली’ हा चित्रपट करत आहे. तिने ‘जर्सी’चे शूटिंग पूर्ण केले आहे, पण’तूफान’ आणि’ पिप्पा’चे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. ज्या वेळी पिप्पा चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल त्याच वेळी ‘डॉक्टर जी’चे शूटिंगदेखील सुरू होणार आहे. त्यामुळे तिने हा चित्रपट सोडल्याची चर्चा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.