आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता वरुण धवन येत्या 24 जानेवारी रोजी गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत विवाहबद्ध हओणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, वरुणचे वडील डेविड धवन यांच्या जवळच्या मित्राने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अलिबागमध्ये होणारा हा विवाहसोहळा अतिशय खासगी असणार आहे.
लग्न धुमधडाक्याने होणार नाही
बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, डेव्हिड यांच्या मित्राने सांगितले की, "कित्येक दिवसांपासून मला पत्रकारांकडून फोन कॉल येत आहेत आणि मी त्यांना ही बातमी केवळ अफवा असल्याचे सांगतोय. परंतु मी तुमच्याशी खोटे बोलू शकत नाही. होय, वरुणचे 24 जानेवारी रोजी अलिबागमध्ये लग्न होणार आहे. अजून किती काळ वाट बघणार तो. कोरोना अजून काही दिवस संपणार नाहीये. त्याने 'कुली नं. 1' रिलीज झाल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लोक धुमधडाक्यात लग्नसोहळे करत आहेत. मात्र वरुण आणि नताशा असे करणार नाहीत. 50 हून अधिक लोकांना जर त्यांनी आमंत्रित केले, तर ते अडचणीत येऊ शकतात. म्हणून अतिशय साध्या पद्धतीने हा लग्नसोहळा होणार आहे."
कोणत्याला मित्राला आमंत्रण नाही
लग्नाच्या आमंत्रणासंदर्भात डेविड धवन यांच्या मित्राने सांगितले की, "कोणत्याही मित्राला लग्नात आमंत्रित करण्यात आलेले नाही. कारण एका बोलावले तर दुस-याला वाईट वाटेल. म्हणून फक्त कुटुंबातील सदस्यच या लग्नात सहभागी होतील. जेव्हा मी डेव्हिड यांच्यासमोरची अडचण बघितली, तेव्हा पाहुण्यांच्या यादीतून त्यांना मी माझेही नाव काढायला सांगितले. वरुण अजून लग्नसाठी किती काळ वाट बघणार, त्याने वयाची तिशी ओलांडली आहे. मला आनंद झाला आहे की तो लग्न करतोय."
200 पाहुण्यांना आमंत्रित केल्याचा खोटा दावा?
काही दिवसांपूर्वी मीडियात चर्चा होती की, वरुण आणि नताशा या महिन्यात लग्न करतील आणि त्यांनी लग्नात सहभागी होणा-या 200 पाहुण्यांसाठी पंचतारांकित हॉटेल बुक केले आहे. मात्र डेविड यांच्या मित्राने सांगितल्यानुसार, हा दावा खोटा आहे. 200 पाहुण्यांना लग्नासाठी आमंत्रित करणयात आलेेले नाही.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वरुण म्हणाला होता की, त्याला शक्य तितक्या लवकर लग्न करायचे आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात वरुण-नताशाचे लग्न होणार होते, परंतु कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे ते लांबणीवर टाकण्यात आले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.