आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता वरुण धवनने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान तो वेस्टिब्युलर हायपोफंक्शन या आजाराशी सामना करत असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. आता त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्येतीची माहिती देत चाहत्यांचे आभार मानले आहेत. ट्विटरवर पोस्ट शेअर करत वरुणने सांगितले की, आता तो पूर्वीपेक्षा खूप बरा आहे. यासोबतच तो आता हळूहळू त्यांच्या जीवनशैलीतही बदल करत असल्याचेही त्याने सांगितले.
वरुणने दिले हेल्थ अपडेट
आपल्या तब्येतीबद्दल बोलताना वरुणने पोस्टमध्ये लिहिले- '"मित्रांनो, एका मुलाखतीत मी माझ्या आजारावर भाष्य केले. तेव्हापासून तुम्ही मला काळजी घेण्याचा सल्ला देत आहात. तुमचे प्रेम आणि भक्कम पाठिंब्यामुळेच मी या परिस्थितीचा सामना करू शकतो," असे वरुण म्हणाला.
वरुण पुढे म्हणाला, "माझ्या तब्येतीबद्दल काळजीत असलेल्या सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की आता मला पूर्वीपेक्षा बरे वाटत आहे. उत्तम आरोग्यासाठी मी दररोज योगा, पोहणे आणि जीवनशैलीत बदल करत आहे. सर्वांच्या आशीर्वादासोबतच सकाळी सूर्यप्रकाश घेणे देखील आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे," असे तो म्हणाला.
वरुणच्या पोस्टवर चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
वरुणच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने पोस्टमध्ये लिहिले - 'बाबू, तुझ्यावर आमचे खूप प्रेम आहे. कृपया अधिक ताण घेऊ नको. कृपया स्वतःची काळजी घे.' आणखी एका चाहत्याने लिहिले- 'वरूण कृपया स्वतःची काळजी घे, आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे.'
वेस्टिब्युलर हायपोफंक्शन म्हणजे काय?
वेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा एक प्रकारचा मेडिकल डिसऑर्डर आहे. हा विकार कानात आतल्या बाजूने होतो. मानवी शरीरात एक वेस्टिब्युलर प्रणाली असते, जी कान, डोळे आणि स्नायू यांचे संतुलन राखते. मात्र, वेस्टिब्युलर हायपोफंक्शनची समस्या निर्माण झाल्यास रुग्णाच्या मेंदूला संदेश पोहोचवण्यात अडचण येते. यामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे संशोधनात समोर आले आहे. वेस्टिब्युलर हायपोफंक्शन दोन प्रकारचा असतो. पहिला एकतर्फी वेस्टिब्युलर हायपोफंक्शन (UVH) आहे, ज्यामुळे एका कानाची मुख्य वेस्टिब्युलर प्रणाली योग्यरित्या कार्य करत नाही तर दुसरा प्रकार द्विपक्षीय वेस्टिब्युलर हायपोफंक्शन ( BVH) आहे, जो दोन्ही कानांवर परिणाम करतो.
25 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे 'भेडिया'
वरुण धवनचा बहुप्रतिक्षित 'भेडिया' हा चित्रपट 25 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. वरुण व्यतिरिक्त या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी आणि क्रिती सेनन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा एका लांडग्याने चावा घेतलेल्या तरुणाची आहे. लांडगा चावल्यानंतर तो मुलगाही लांडग्यासारखे वागू लागतो. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.