आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

34 वर्षांचा झाला बॉलिवूडचा हॅण्डसम हंक:असिस्टंट डायरेक्टर म्हणून वरुण धवनने केली होती करिअरला सुरुवात, पत्नी नताशाने चार वेळा दिला होता प्रेमाला नकार

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वरुण धवनने करण जोहरचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणे सुरु केले होते.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आज आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 24 एप्रिल 1987 रोजी मुंबई येथे झाला. वरुण हा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे. वरुण धवनने यूकेतील नॉटिंघम युनिव्हर्सिटीतून बिझनेस मॅनेजमेंट या विषयाची पदवी प्राप्त केली आहे. भारतात आल्यानंतर त्याने करण जोहरचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणे सुरु केले होते. त्याने करणच्या 'माय नेम इज खान' या चित्रपटासाठी पहिल्यांदा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

'मैं तेरा हीरो', 'हम्प्टी शर्मा की दुल्हिनया', 'बदलापूर', 'एबीसीडी 2', 'दिलवाले', 'ऑक्टोबर' यासह ब-याच चित्रपटांमध्ये वरुणने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. काही दिवसांपूर्वीच आलेला त्याचा 'कुली नंबर 1' हा चित्रपटदेखील बराच गाजला.

नताशा दलालसोबत थाटले लग्न
वरुण याचवर्षी 24 जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकला आहे. त्याने त्याची बालमैत्रीण नताशा दलालशी लग्न केले आहे. नताशा आणि वरुण एकाच शाळेत शिकले. वरुणने करीना कपूरच्या 'व्हॉट वुमन वांट' या चॅट शोमध्ये आपली लव्ह स्टोरी सांगितली होती.

बालपणापासून एकमेकांना ओळखतात वरुण-नताशा
नताशा -वरुणची लव्हस्टोरी कोणत्याही बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाहीये. शाळेत असल्यापासून दोघेही एकमेकांना ओळखायचे. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.

आपल्या लव्ह स्टोरीबद्दल सांगताना वरुण म्हणाला होता, 'मी सहावीत असताना नताशाला भेटलो होतो. तेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो. अकरावी किंवा बारावीपर्यंत आम्ही चांगले मित्र होतो. पण मला आठवतंय की जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हा आम्ही मॅनेकेजी कूपर या शाळेत होतो. ती यलो हाऊस आणि मी रेड हाऊसमध्ये होतो. आम्ही बास्केटबॉलच्या कोर्टमध्ये होतो आणि दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली की ते आम्हाला स्नॅक्स द्यायचे. अजुनही मला ती समोरुन येताना आठवते. मी तिला पाहिले आणि मला असे वाटले की मी तिच्या प्रेमात पडलो. तिने मला तीन ते चार वेळा नकार दिला होतो. पण मी आशा सोडली नाही,' असे वरुण म्हणाला.

प्रसिद्ध ड्रेस डिझायनर आहे नताशा
खूप कमी जणांना माहित आहे की नताशा बॉलिवूडमध्येच कार्यरत आहे. नताशा ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. 2013 मध्ये तिने फॅशन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी न्यूयॉर्कमधून पदवी मिळवली आहे. त्यानंतर ती भारतात आली आणि डिझायनर म्हणून काम सुरू केले. नताशाचा जन्म 16 मार्च 1989 रोजी मुंबईत झाला. नताशाचे वडील राजेश दलाल हे उद्योगपती आहेत. तर आईचे नाव गौरी दलाल आहे. नताशाने आतापर्यंत अनेक बॉलिवूडमधील सेलिब्रिटींसाठी तिन ड्रेस डिझाईन केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...