आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Varun Dhawan Will Host Bollywood Ki Home Delivery Live Session, Where Alia Bhatt, Abhishek Bachchan, Akshay Kumar, Ajay Devgn To To Announce Film Release Date

बॉलिवूडकी होम डिलिवरी:सडक 2, लक्ष्मी बॉम्ब आणि भूजसह 9 चित्रपट OTT वर होणार रिलीज, लक्ष्मी बॉम्बविषयी सांगतोय अक्षय 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नऊ चित्रपटांच्या तुकडीचे नाव आहे डिस्ने प्लस मल्टीप्लेक्स
  • वरुण धवन, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार आणि अजय देवगण चित्रपटांच्या रिलीज डेटची घोषणा करत आहेत.

सोमवारी वरुण धवन, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार आणि अजय देवगण झूम कॉलवर आपल्या आगामी चित्रपटांच्या रिलीज डेटची घोषणा करत आहेत. या कलाकारांचे चित्रपट आगामी दिवसांत डिस्ने प्लस हॉटस्टार या  OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत.

चित्रपटांच्या रिलीजविषयी सांगत आहेत स्टार्स

  • लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले गेले. ज्यात तृतीयपंथीची भूमिका साकारत असलेला अक्षय झळकला आहे. अक्षयने आपल्या चित्रपटाविषयी सांगितले असून कियारा आडवाणीसोबतचा त्याचा हा तिसरा चित्रपट आहे. 

अक्षय कुमारने सांगितले की, गेल्या 20 वर्षांच्या करिअरमध्ये तो पहिल्यांदाच एवढे दिवस घरी राहिला. एवढ्या काळात तर मी आणि डेविड धवन मिळून दोन ते तीन चित्रपट बनवले असते, असेही तो म्हणाला. 

आलिया भट्ट म्हणाली - मी याकाळात गिटार शिकतेय. आठवड्यातून तीन ते चार दिवस क्लास करतेय. मेडिटेशन कोर्सदेखील करतेय. याकाळात खूप टीव्ही पाहिला. 

अजय देवगणने सांगितले की, मी 22 वर्षांपूर्वीच लॉकडाऊन झालो होतो. जेव्हा मी घरी असतो तेव्हा सगळ्यांना त्रास देतो. जेव्हा एकटा असतो तेव्हा रोज रात्री एक ते दीड तास वेब शो बघतो. 

थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघणे वेगळा अनुभव असतो. मात्र थिएटरमध्ये जाणे रोज शक्य नसते. आपल्याजवळ आता ओटीटी प्लॅटफॉर्मसारखे एक नवीन माध्यम आहे, ज्याचे यूजर खूप आहेत. आम्ही चांगले चित्रपट बनवू, जे सगळ्यांना पसंत पडतली.  

आलिया भट्टचा सडक 2, अभिषेक बच्चनचा द बिग बूल, अक्षय कुमारचा लक्ष्मी बम आणि अजय देवगणच्या भूज या चित्रपटांचा यात समावेश आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या कलाकारांचे एवढे चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. या अंतर्गत आतापर्यंत 8 ते 9 चित्रपट यात सामील करण्यात आले आहेत.

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात चित्रपटगृह उघडण्याची स्थिती बघता पुढच्या चित्रपटांच्या बाबतीत निर्णय घेतले जातील. बॉलिवूड होम डिलिव्हरी अंतर्गत ऑगस्ट महिन्यात कुठल्या चित्रपटाने याची सुरुवात होईल, याची अधिकृत घोषणा या कार्यक्रमात केली जाणार आहे.

ऑगस्टच्या अखेरपर्यंत रिलीज होऊ शकतो सडक 2
आलिया भट्ट्च्या 'सडक 2'चे काही दिवसांचे चित्रीकरण अद्याप बाकी आहे. त्याचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम शिल्लक आहे. त्यामुळे हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर ऑगस्टच्या शेवटच्या शुक्रवारपर्यंत रिलीज केला जाऊ शकतो.