आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुण धवनच्या काकांनी दिला दुजोरा:अनिल धवन म्हणाले - 24 जानेवारीला होणार वरुण-नताशाचे लग्न, कोरोना प्रोटोकॉलमुळे नातेवाईकांनाही आमंत्रित केले नाही

अमित कर्ण6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वरुण येत्या 24 जानेवारीला लग्न करणार आहे.

अभिनेता वरुण धवनचे काका अनिल धवन यांनी वरुण आणि नताशा दलाल यांच्या लग्नाच्या वृत्तावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. दिव्य मराठीसोबतच्या खास बातचीतमध्ये अनिल यांनी सांगितले की, वरुण येत्या 24 जानेवारीला लग्न करणार आहे. अनिल यांनी सांगितल्यानुसार, ते वरुणच्या लग्नाला हजेरी लावतील आणि दुस-याच दिवशी वेब शोच्या शूटिंगसाठी रवाना होतील.

लग्नाला बर्‍याच लोकांना आमंत्रित केले नाही
अनिल यांनी पुढे सांगितले, "मी लग्नाला हजर राहून 25 जानेवारीला माझ्या वेब शोच्या शूटिंगसाठी ग्वाल्हेरला निघून जाईन. कोरोना प्रोटोकॉलमुळे आम्ही बर्‍याच लोकांना लग्नासाठी आमंत्रित केले नाही. त्यामुळे वरुणचे लग्न नाहीये, असा समज काही लोकांना झाला आहे, परंतु तसे नाही. केवळ घरातील लोकांच्या उपस्थितीत 24 तारखेला पारंपरिक पद्धतीने हा विवाहसोहळा होईल. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही इंडस्ट्रीतील लोकांसाठी एका ग्रॅण्ड रिसेप्शनचे आयोजन करु.'

संगीत सेरेमनीसारखे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत
वरुणच्या लग्नात संगीत सेरेमनीसारखे कार्यक्रम होतील की नाही असे अनिल धवन यांना विचारले असता ते म्हणाले, "नाही. आम्ही नातेवाईकांना आमंत्रित केलेले नाही, त्यामुळे भव्य सेलिब्रेशन होणार नाही. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही सर्वांना आमंत्रित करु आणि तेव्हा हे सर्व सोहळे करु. साध्या पद्धतीने लग्न करुन सुनेला घरी घेऊन या, असे आमचे सर्वांचे मत झाले. आणि म्हणून अतिशय मोजक्या लोकांत हे लग्न होणार आहे."

अनिल पुढे म्हणाले, "जयपूर किंवा परदेशात जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करण्यावर आमच्या कुटुंबीयांचा विश्वास नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः वरुण त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये खूप व्यस्त आहे."

फक्त घरातील लोकच लग्नात सामील होतील

अनिल धवन यांनी पुढे सांगितल्यानुसार, वरुणच्या लग्नात फक्त 50-55 लोक सहभागी होतील. अलीबागमध्ये हे लग्न होणार आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वरुण देखील म्हणाला होता की, त्याला शक्य तितक्या लवकर लग्न करायचे आहे. खरं तर गेल्यावर्षी मे महिन्यात वरुण आणि नताशा यांचे लग्न होणार होते. परंतु कोरोना आणि लॉकडाउनमुळे ते लांबणीवर पडले होते.

बातम्या आणखी आहेत...