आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉस्पिटलाइज्ड:दिग्दर्शक डेव्हिड धवन रुग्णालयात दाखल, वरुण धवनने 'जुगजुग जियो'चे प्रमोशन अर्ध्यावर सोडले

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डेव्हिड यांना अ‍ॅडव्हान्स स्टेज डायबिटीजचा त्रास

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेता वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डेव्हिड यांची प्रकृती बिघडली तेव्हा वरुण त्याचा आगामी चित्रपट 'जुगजुग जियो'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता. वडिलांच्या आजारपणाची बातमी समजताच वरुणने प्रमोशन अर्धवट सोडले आणि तो हॉस्पिटलमध्ये गेला.

डेव्हिड यांना अ‍ॅडव्हान्स स्टेज डायबिटीजचा त्रास
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेव्हिड यांना अ‍ॅडव्हान्स स्टेज डायबिटीज आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती यापूर्वीही अनेकदा बिघडली आहे. मधुमेहामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

चित्रपटाचे प्रमोशन सोडून वरुण हॉस्पिटलमध्ये आला
सध्या वरुण धवन त्याचा आगामी चित्रपट 'जुगजुग जियो'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. बुधवारी म्हणजेच 15 जून रोजी दुपारी अभिनेता त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करत होता. वरुणला वडिलांच्या तब्येतीची माहिती मिळताच तो कार्यक्रम सोडून घाईघाईत हॉस्पिटलमध्ये धावला.

वरुणचा हा चित्रपट 24 जूनला होणार आहे प्रदर्शित
वरुणचा 'जुगजुग जियो' हा चित्रपट येत्या 24 जून 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. फॅमिली ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे.

डेव्हिडने यांनी केले आहे अनेक हिट चित्रपट दिग्दर्शित
डेव्हिड धवन यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 'कुली नंबर 1', 'मैं तेरा हीरो', 'जुडवा', 'हसीना मान जायगी', 'साजन चले सुसरल', 'जोडी नंबर 1', 'पार्टनर', 'मैने प्यार क्यूं किया' यांसारखे हिट चित्रपट त्यांच्या नावी आहेत.

बातम्या आणखी आहेत...