आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुणची थँक यू नोट:लग्नानंतर वरुण धवनचा चाहत्यांसाठी खास मेसेज, म्हणाला - तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे पॉझिटिव्हिटी मिळाली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेब्रुवारी महिन्यात वेडिंग रिसेप्शन

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन लाँग टाइम गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत 24 जानेवारी रोजी लग्नाच्या गाठीत अडकला. दोघांचे लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अलिबागच्या द मॅन्शन हाऊस या आलिशान रिसॉर्टमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा संपन्न झाला. लग्नानंतर आता वरुणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

'मी मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानतो. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे पॉझिटिव्हिटी मिळाली आहे,' असे वरुण म्हणाला आहे.

फेब्रुवारी महिन्यात वेडिंग रिसेप्शन
वरुण आणि नताशाच्या लग्नाला करण जोहरने हजेरी लावली होती. आता येत्या 2 फेब्रुवारी रोजी मुंबईत वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. शाहरुख खान, कतरिना कैफ, जॅकलीन फर्नांडिस, श्रद्धा कपूर यांसारखे कलाकार या रिसेप्शनमध्ये सहभागी होऊ शकतात.

बालपणापासून एकमेकांना ओळखतात वरुण-नताशा
अलीकडेच एका मुलाखतीत वरुणने त्याची लव्ह स्टोरी सांगितली होती. 'मी सहावीत असताना नताशाला भेटलो होतो. तेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो. अकरावी किंवा बारावीपर्यंत आम्ही चांगले मित्र होतो. पण मला आठवतंय की जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हा आम्ही मॅनेकेजी कूपर या शाळेत होतो. ती यलो हाऊस आणि मी रेड हाऊसमध्ये होतो. आम्ही बास्केटबॉलच्या कोर्टमध्ये होतो आणि दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली की ते आम्हाला स्नॅक्स द्यायचे. अजुनही मला ती समोरुन येताना आठवते. मी तिला पाहिले आणि मला असे वाटले की मी तिच्या प्रेमात पडलो. तिने मला तीन ते चार वेळा नकार दिला होतो. पण मी आशा सोडली नाही,' असे वरुण म्हणाला.

प्रसिद्ध ड्रेस डिझायनर आहे नताशा
नताशा प्रसिद्ध ड्रेस डिझायनर आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूडमधील सेलिब्रिटींसाठी तिन ड्रेस डिझाईन केले आहेत. नताशाने न्यूयॉर्कमधून फॅशन डिझाइनिंगचे शिक्षण घेतले आहे. नताशाचे वडील उद्योगपती असून आई गृहिणी आहे.

बातम्या आणखी आहेत...