आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेडिंग बेल्स:अलिबागच्या 'द मॅन्शन हाऊस'मध्ये 24 जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण-नताशा,  सलमान, कतरिना, रणबीर, आलियासह अनेक स्टार्स लग्नात होणार सहभागी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नताशा कुटुंबासह मुंबईहून अलिबागला रवाना

अभिनेता वरुण धवन येत्या 24 जानेवारीला गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्न करणार आहे. वरुणचे काका अनिल धवन यांनी दिव्य मराठीसोबतच्या खास बातचीतमध्ये या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अलिबागच्या 'द मॅन्शन हाऊस' या लग्नझरी रिसोर्टमध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. रिपोर्टनुसार या रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल, गार्डन एरिया, 25 खोल्या आणि इतर अनेक लक्झरी आणि आधुनिक सुविधा आहेत.

नताशा कुटुंबासह मुंबईहून अलिबागला रवाना

वरुण धवन आणि नताशा दलाल आपल्या कुटुंबियांसह शुक्रवारी मुंबईहून अलिबागला रवाना झाले आहेत. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय रिसॉर्ट आणि नताशाच्या लेहेंगाचे काही फोटोही समोर आले आहेत. व्हायरल फोटोमध्ये 'द मॅन्शन हाऊस'मध्ये सुरू असलेल्या तयारीची झलक दिसतेय.

पंजाबी स्टाईल वेडिंग
वृत्तानुसार, 23 जानेवारीला हळद, मेहंदी, संगीत असे वेगवेगळे विधी होणार आहेत. त्यानंतर 24 जानेवारी रोजी वरुण धवन आणि नताशा दलाल पंजाबी पद्धतीने लग्न करणार आहेत. वरुणच्या कुटूंबाकडून नताशासाठी वधूचा पोशाख आणि इतर आवश्यक वस्तू पाठवल्या जातील.

सलमान-रणबीरसह अनेक स्टार्स ​​​​​​​लग्नात होतील सामील
कोविडमुळे अलिबागमध्ये होणार हे लग्न अतिशय खासगी असेल. तथापि, वरुण आणि नताशाच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त काही मोजकेच लोक लग्नाला उपस्थित राहतील. रिपोर्ट्सनुसार सलमान खान, कतरिना कैफ, रणबीर कपूर, आलिया भट्ट, करण जोहर, जॅकलिन फर्नांडिस असे अनेक स्टार लग्नाला येऊ शकतात. लग्नानंतर मुंबईत रिसेप्शन पार्टीदेखील देण्यात येणार आहे. या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटी आणि इतरांनाही आमंत्रित केले जाणार आहे.

2 दिवसांपूर्वी नताशाच्या घरी झाली होती रोका सेरेमनी
वृत्तानुसार वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची सर्व तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. वरुणचे वडील डेव्हिड धवन, भाऊ रोहित आणि वहिनी जाह्नवी हे 20 जानेवारीला डिझायनर मनीष मल्होत्राच्या स्टोअरच्या बाहेर दिसले होते. 2 दिवसांपूर्वी नताशाच्या घरी रोका सेरेमनी झाली. वरुण-नताशाचे लग्न गेल्या वर्षी मेमध्ये होणार होते, परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले होते.

बातम्या आणखी आहेत...