आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Varun Natasha's Wedding Rituals Such As Turmeric, Mehndi, Music Will Be Held In 'The Mansion House' Today, Tight Security Arrangements Outside The Resort

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वरुणचे लग्न:'द मॅन्शन हाऊस'मध्ये आज होतील वरुण-नताशाच्या हळद, मेहंदी, संगीतासह लग्नाच्या विविध विधी, रिसॉर्टमध्ये दाखल झाला वरुण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज हळद, मेहंदी, संगीत अशा वेगवेगळ्या विधी असतील.

अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाला आता फक्त एक दिवस शिल्लक आहे. हे दोघे 24 जानेवारी (रविवारी) रोजी अलिबागच्या 'द मॅन्शन हाऊस' या भव्य रिसॉर्टमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. वरुण धवन आणि नताशा दलाल हे आपापल्या कुटुंबियांसमवेत शुक्रवारी 'द मॅन्शन हाऊस'मध्ये पोहोचले. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता 23 जानेवारी (शनिवार) रोजी अर्थात आज हळद, मेहंदी, संगीत अशा वेगवेगळ्या विधी असतील. वृत्तानुसार मेहंदी आर्टिस्ट वीणा नागदा वरुण-नताशाच्या मेहंदी सोहळ्यासाठी रिसॉर्टमध्ये पोहोचल्या आहेत.

वरुण आणि नताशाच्या लग्नासाठी 'द मॅन्शन हाऊस'ला नववधूसारखे सजवले गेले आहे. या रिसॉर्टचेही काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रिसॉर्टच्या बाहेरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल, गार्डन एरिया, 25 खोल्या आणि इतर अनेक लक्झरी आणि आधुनिक सुविधा आहेत. रिसॉर्टशिवाय नताशाच्या लेहेंगाचे काही फोटोही समोर आले होते.

बरेच स्टार्स लग्नात होतील सामील
कोविडच्या पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये होणा-या या लग्नसोहळ्यात मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. वरुण आणि नताशाच्या कुटूंबाव्यतिरिक्त काही जवळच्या मित्रांसह 50 लोक
लग्नाला उपस्थित राहतील. रिपोर्ट्सनुसार सलमान खान, कतरिना कैफ, रणबीर कपूर, आलिया भट्ट, करण जोहर, जॅकलिन फर्नांडिस, मनीष मल्होत्रा, श्रद्धा कपूर असे अनेक स्टार्स या लग्नात सहभागी
होऊ शकतात.

रिसॉर्टबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
रिसॉर्टबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

अमिताभ, गोविंदा आणि अनिल कपूर यांना आमंत्रण नाही
वृत्तानुसार, शाहरुख खानलाही आमंत्रित करण्यात आले आहे. पण सध्या तो 'पठाण' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे लग्नात सहभागी होऊ शकणार नाही. दुसरीकडे अमिताभ बच्चन,
पहलाज निहलानी, गोविंदा आणि अनिल कपूर यांच्या कुटुंबीयांना लग्नासाठी आमंत्रित केलेले नाही. मात्र लग्नानंतर मुंबईत एक रिसेप्शन पार्टी होणार आहे. या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटी आणि
इतरांनाही आमंत्रित केले जाणार आहे.

पंजाबी स्टाईल वेडिंग
वृत्तानुसार, 24 जानेवारी रोजी वरुण धवन आणि नताशा दलाल पंजाबी पद्धतीने लग्न करणार आहेत. वरुणच्या कुटूंबाकडून नताशासाठी वधूचा पोशाख आणि इतर आवश्यक वस्तू पाठवल्या जातील.

मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे ड्रेस
वृत्तानुसार, वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. वरुणचे वडील डेव्हिड धवन, भाऊ रोहित आणि वहिनी जाह्नवी हे 20 जानेवारी रोजी डिझायनर मनीष मल्होत्राच्या
स्टोअर बाहेर दिसले होते. याचा अर्थ मनीष मल्होत्राने नताशा आणि वरुणसाठी लग्नाचे कपडे डिझाइन केले आहेत. वरुण-नताशाचे लग्न गेल्या वर्षी मेमध्ये होणार होते, परंतु कोरोना आणि लॉकडाउनमुळे त्यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले होते.

बातम्या आणखी आहेत...