आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुण शर्माने केले सोनाक्षी-झहीरच्या नात्यावर शिक्कामोर्तब:जोडप्याचा फोटो शेअर करत लिहिले- याला म्हणतात ब्लॉकबस्टर जोडी

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या अफेअरची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. नुकतेच दोघेही मुंबईतील एका रेस्तराँमध्ये एकत्र डिनर करताना दिसले. आता या दोघांचा एक फोटो समोर आला आहे, जो बॉलिवूड अभिनेता वरुण शर्माने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वरुण शर्माने सोनाक्षी-झहीरचा फोटो शेअर केला आहे

हा फोटो शेअर करत वरुण शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ओये होये, याला म्हणतात ब्लॉकबस्टर जोडी.' यासोबतच त्याने या पोस्टमध्ये सोनाक्षी आणि झहीरलाही टॅग केले आहे. या फोटोमध्ये सोनाक्षी आणि झहीर एकमेकांकडे बघून हसत आहेत. या पोस्टद्वारे वरुणने झहीर आणि सोनाक्षीच्या नात्यावरही शिक्कामोर्तब केले आहे.

दोघे अनेकदा एकत्र दिसतात

झहीर आणि सोनाक्षी एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. काही काळापूर्वी सोनाक्षीने तिचा ब्युटी ब्रँड लाँच केला होता, ज्यासाठी केलेल्या फोटोशूटमध्ये ती हिऱ्याची अंगठी फ्लाँट करताना दिसली होती. तेव्हापासून चाहत्यांनी दोघांच्या साखरपुड्याचा अंदाज लावला होता.

'डबल एक्सएल'मध्ये एकत्र दिसणार आहेत सोनाक्षी-झहीर

झहीर इक्बालने 'नोटबुक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली होती. तर सोनाक्षीने 2010 मध्ये आलेल्या 'दबंग' चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांची पहिली भेट सलमान खानने करुन दिली होती, त्यानंतर दोघांची मैत्री झाली. वर्क फ्रंटवर, दोघेही आगामी 'डबल एक्सएल' या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...