आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वरुणचे लग्न:लग्न स्थळावर पोहोचण्यापूर्वी वरुणचा अपघात, थोडक्यात बचावला; अलीबागच्या 'द मेंशन हाउस'मध्ये आज बोहल्यावर चढणार वरुण-नताशा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्न स्थळावर पोहोचण्यापूर्वी वरुणचा अपघात

अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल रविवारी (24 जानेवारी) म्हणजेच आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. दोघेही अलीबागच्या शानदार रिजॉर्ट 'द मेंशन हाउल' मध्ये बोहल्यावर चढतील. शनिवारी वरुण-नताशाची मेंदी, संगीत सारखे लग्नाचे विधी झाले आहेत. मात्र आज रिसॉर्टवर जात असतानाच वरुण धवनच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने यामध्ये त्याला दुखापत झालेली नाही. केवळ गाडीचे नुकसान झाले आहे. या अपघातात वरुण थोडक्यात बचावला आहे.

लग्न स्थळावर पोहोचण्यापूर्वी वरुणचा अपघात
रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या विधींपूर्वी वरुणने आपल्या मित्रांसोबत बॅचलर पार्टी केली होती. ही पार्टी वेडिंग वेन्यूच्या जवळच्याच लोकेशनवर होती. मित्रांसोबत एन्जॉय केल्यानंतर वरुण शनिवारी लग्न स्थळ 'द मेंशन हाउस' वर पोहोचला होता. ज्याचे काही फोटोजही समोर आले होते. वृत्तांनुसार, बॅचलर पार्टीवरुन मित्रांसोबत परतत असताना वरुणच्या गाडीला छोटा अपघात झाला. सुदैवाने या अपघातावेळी वरुण आणि त्याच्या मित्रांना दुखापत झालेली नाही.

वरुण-नताशाने केला रोमँटिक गाण्यावर डान्स
रिपोर्ट्सनुसार, वरुण-नताशाच्या ग्रँड संगीत सेरेमनीला करण जोहरने होस्ट केले होते. या संगीत सेरेमनीमध्ये आलिया भट, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर आणि इतर अनेक लोकांनी डान्स परफॉर्मेंस दिला. नवरदेव-नवरी वरुण-नताशा यांनीही एका रोमँटिक गाण्यावर स्पेशल डान्स परफॉर्मेंस दिला होता.