आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
1999 मध्ये रिलीज झालेल्या 'वास्तव' या सिनेमात संजय दत्तच्या प्रेयसीची भूमिका वठवणारी अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिचा आज वाढदिवस आहे. 22 जानेवारी, 1972 रोजी जन्मलेली नम्रता 1993 साली मिस इंडियाचा ताज जिंकून पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आली होती. मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धत ती पाचव्या स्थानावर होती. ब्युटी कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर काही वर्षे मॉडेलिंग करुन ती सिनेसृष्टीकडे वळली होती. मात्र आता ती लाइमलाइटपासून दूर गेली आहे.
स्वतःपेक्षा कमी वयाच्या अभिनेत्यासोबत थाटला संसार
बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर नम्रता साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडे वळली. 2000 मध्ये तेलगू फिल्म ‘वामसी’च्या शूटिंगच्या काळात तिची भेट साऊथचा सुपरस्टार महेश बाबूसोबत झाली. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर 10 फेब्रुवारी 2005 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. महेश बाबू नम्रतापेक्षा वयाने तीन वर्षांनी लहान आहे. ऑगस्ट 2006 मध्ये तिने मुलगा गौतमला जन्म दिला. त्यांची मुलगी सिताराचा जन्म 20 जुलै 2012 रोजी झाला. नम्रता पती आणि मुलांसोबत आता हैदराबादमध्ये स्थायिक झाली आहे.
म्हणून चित्रपटसृष्टीला ठोकला रामराम
नम्रताने काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आणि महेश बाबूच्या नात्याविषयीच्या अनेक गोष्टींवर वक्तव्य केले होते. त्यावेळी तिने सांगितले होते की, महेशला वर्किंग वुमनशी लग्न करायचे नव्हते.
‘महेशने एक गोष्ट ठरवली होती की त्याला वर्किंग वुमनशी लग्न करायचे नव्हते’ असे नम्रता म्हणाली. त्यामुळे लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला.
सलमान खानसोबत पहिला सिनेमा
1998 मध्ये नम्रताने सलमान खानसोबत ‘जब प्यार किसी से होता है’ या सिनेमातून डेब्यू कगेले होते. या सिनेमातील तिची भूमिका छोटी होती. या सिनेमात ट्विंकल खन्ना लीड अॅक्ट्रेस होती. खरं तर नम्रताने साइन केलेला पहिला सिनेमा ‘पूरब की लैला पश्चिम की छैला’ हा होता. मात्र अद्याप हा सिनेमा रिलीज झालेला नाही.
नम्रताची आजी मीनाक्षी शिरोडकर या मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. तर नम्रताची थोरली बहीण शिल्पा शिरोडकर ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती.
'वास्तव' या सिनेमाच्या शूटिंगच्या काळात अभिनेते महेश मांजरेकर आणि नम्रता शिरोडकर यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. असे म्हटले जाते, की महेश मांजरेकर त्यांच्या प्रत्येक सिनेमा नम्रताला साइन करत होते.
नम्रताच्या हिट सिनेमांमध्ये पुकार, वास्तव, हेरा फेरी, अस्तित्व, कच्चे धागे, तेरा मेरा साथ रहे, LOC कारगिल या सिनेमांचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.