आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमँटिक अंदाज:इशिता दत्ताचे बेबी शॉवर, वत्सल सेठने बेबी बंपवर केले किस; लग्नाच्या 6 वर्षांनंतर होणार आहेत आईबाबा

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'टार्जन' फेम अभिनेता वत्सल सेठ आणि 'दृश्यम' फेम अभिनेत्री इशिता दत्ता लवकरच आई-बाबा होणार आहेत. यानिमित्ताने रविवारी मुंबईतील जिमखाना येथे इशिताच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर इशिता आणि वत्सल यांनी पापाराझींसमोर येत त्यांना एकत्र पोज दिल्या. यावेळी दोघांचा रोमँटिक अंदाज लक्ष वेधून घेणारा होता. इशिता आणि वत्सलचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

वत्सलने इशिताच्या बेबी बंपचे घेतले चुंबन
डोहाळे जेवणासाठी इशिताने गुलाबी रंगाची पारंपरिक साडी निवडली. या साडीत ती खूपच सुंदर दिसली. यावेळी इशिताने केसांचा अंबाडा घातला होता आणि सोबत पारंपरिक सोन्याचे दागिने घातले. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसली. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा ग्लो बघायला मिळतोय.

दुसरीकडे वत्सल पांढरा कुर्ता आणि पायजामामध्ये अगदी सिंपल लूकमध्ये दिसला. समोर आलेल्या व्हिडिओत वत्सल इशिताला मिठी मारताना आणि तिच्या बेबी बंपचे चुंबन घेताना दिसला.

कपलने पाहुण्यांचे मानले आभार
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, इशिता आणि वत्सल यांनी त्यांच्या आयुष्यातील या नवीन फेजबद्दलचा आनंद शेअर केला. इशिता तिच्या बेबी शॉवरबद्दल म्हणाली, 'हा खूप भावनिक आणि सुंदर क्षण होता. वेगवेगळ्या ठिकाणाहून आमचे नातेवाईक आमचे अभिनंदन आणि आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. त्यांनी येऊन आशीर्वाद दिला याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत.'

मोठी बहीण तनुश्री दत्ताची बेबी शॉवरला हजेरी, म्हणाली - मला वाटतंय मुलगा होईल
इशिता दत्ताची मोठी बहीण तनुश्री दत्तानेही या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी तनुश्रीनेही दोघांसोबत पोज दिली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तनुश्री म्हणाली की, इशिताला मुलगा होईल, असे तिला वाटतंय.