आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या आठवड्यात 'वेड'चे सुपरहिट कलेक्शन:सात दिवसात जमवला तब्बल 20 कोटींहून अधिकचा गल्ला, 'सर्कस', 'अवतार 2' पडले फिके

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख स्टारर ‘वेड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रिलीजच्या अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 20 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. खरं तर चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे. तरीही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करत आहेत.

‘वेड’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने कितपत कमाई केली हे समोर आले आहे. आठवड्याभरामध्ये ‘वेड’ने 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि ट्रेड अनालिस्ट तरण आदर्श यांनी 'वेड' चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली, याची माहिती दिली आहे.

'वेड'चे एकुण सात दिवसांचे कलेक्शन

  • पहिला दिवस (शुक्रवार, 30 डिसेंबर) - 2.25 कोटी
  • दुसरा दिवस (शनिवार, 31 डिसेंबर) - 3.25 कोटी
  • तिसरा दिवस (रविवार, 1 जानेवारी) - 4.50 कोटी
  • चौथा दिवस (सोमवार, 2 जानेवारी) - 3.02 कोटी
  • पाचवा दिवस (मंगळवार, 3 जानेवारी) - 2.65 कोटी
  • सहावा दिवस (बुधवार, 4 जानेवारी) - 2.55 कोटी
  • सातवा दिवस (गुरुवार, 5 जानेवारी) - 2.45 कोटी
  • एकुण - 20.67 कोटी

विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवर 'वेड' या चित्रपटाला मिळणार प्रतिसाद पाहता थिएटर मालकांनी सर्कस या बॉलिवूड आणि अवतार 2 या हॉलिवूड चित्रपटाचे शो कमी केले आहेत. त्यामुळे सध्या बॉक्स ऑफिसवर वेड या मराठी चित्रपटाचाच डंका आहे. वेड हा चित्रपट राज्यभरातील 250 स्क्रीनवर प्रदर्शित झाला असून त्याला 1000 शो मिळाल्याची माहिती आहे.

रितेशला 3 जानेवारी रोजी सिनेसृष्टीत पदार्पण करुन 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच दिवशी त्याचा 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 20 वर्षांनंतर रितेशने वेड या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. दिग्दर्शन, अभिनय, निर्माता अशी तिहेरी भूमिकांचे शिवधनुष्य रितेश देशमुखने यशस्वीरित्या पेलले आहे. तर जिनिलीयानेही एवढ्या वर्षांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. रितेश आणि जिनिलीयाची जोडी 'वेड'च्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.

  • रितेश-जिनिलीयाच्या चित्रपटाने BO ला लावलंय 'वेड':पाचव्या दिवशीही बक्कळ कमाई, कोट्यवधींचा झाला चित्रपटाचा गल्ला

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया स्टारर 'वेड' या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनचे आकडे याचा पुरावा आहे. रिलीजच्या पाचव्या दिवशीही चित्रपटाने तिकीट खिडकीवर जोरदार कमाई केली आहे. अवघ्या तीन दिवसांतच या चित्रपटाने 10 कोटींचा गल्ला जमवला होता. सोमवारी आणि मंगळवारीदेखील चित्रपटाच्या कमाईचा ओघ सुरू राहिला. रिलीजच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशीही चित्रपटाने कोट्यवधीचा गल्ला जमवला आहे. पाच दिवसांत चित्रपटाने एकुण 15.67 कोटींची घसघसशीत कमाई केली आहे. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...