आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया स्टारर 'वेड' या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनचे आकडे याचा पुरावा आहे. रिलीजच्या पाचव्या दिवशीही चित्रपटाने तिकीट खिडकीवर जोरदार कमाई केली आहे. अवघ्या तीन दिवसांतच या चित्रपटाने 10 कोटींचा गल्ला जमवला होता. सोमवारी आणि मंगळवारीदेखील चित्रपटाच्या कमाईचा ओघ सुरू राहिला. रिलीजच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशीही चित्रपटाने कोट्यवधीचा गल्ला जमवला आहे. पाच दिवसांत चित्रपटाने एकुण 15.67 कोटींची घसघसशीत कमाई केली आहे.
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि ट्रेड अनालिस्ट तरण आदर्श यांनी 'वेड' चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली, याची माहिती दिली आहे. तरण यांनी केलेल्या ट्वीटनुसार पहिल्या दिवसापेक्षा 'वेड' चित्रपटाने पाचव्या दिवशी केलेली कमाई अधिक आहे.
तरण आदर्श यांनी असे ट्वीट केले, 'मराठी चित्रपट वेडची विजयी घौडदौड सुरूच आहे. पाचव्या दिवशीही चित्रपट चांगला ट्रेंड होतोय. पाचव्या दिवसाची कमाई पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा अधिक आहे.' यानंतर तरण यांनी चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासून किती कमाई केली याविषयी लिहिले आहे.
रितेशला 3 जानेवारी रोजी सिनेसृष्टीत पदार्पण करुन 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच दिवशी त्याचा 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 20 वर्षांनंतर रितेशने वेड या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. दिग्दर्शन, अभिनय, निर्माता अशी तिहेरी भूमिकांचे शिवधनुष्य रितेश देशमुखने यशस्वीरित्या पेलले आहे. तर जिनिलीयानेही एवढ्या वर्षांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. रितेश आणि जिनिलीयाची जोडी वेडच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.
मराठमोळ्या रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखची ऑन स्क्रिन जोडी तसेच ऑफ स्क्रिन जोडी कायमच चर्चेचा विषय राहिली आहे. या दोघांची केमिस्ट्री पहिल्यांदा 'तुझे मेरी कसम' या सिनेमात पाहायला मिळाली होती. 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आज 20 वर्षं पुर्ण झाली आहेत.
रितेश आणि जिनिलयाच्या पहिल्या-वहिल्या या चित्रपटाने अख्ख्या देशाला 'वेड' लावले होते. 3 जानेवारी 2003 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दोघांचे आयुष्य बदलणारा हा चित्रपट ठरला. त्यांचे प्रेमही या चित्रपटाच्या सेटवरच फुलले होते. त्यानंतर त्यांनी लग्न गाठ बांधली. आज ही ते बॉलिवूड मधील सर्वात हॉट कपल आहे. वाचा सविस्तर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.