आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिग बॉस मराठीच्या घरातून लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे वीणा जगताप आणि शिव ठाकरे. या कार्यक्रमात दोघांचे सूत जुळले होते. दोघांनी त्यांच्या नात्याची कबुलीही दिली होती. पण मध्यंतरी दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. पण आता हे दोघे पुन्हा एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन वर्षांनी वीणाने शिववरचे प्रेम व्यकर्त केले आहे. तर शिवनेही वीणा त्याच्यासोबतच असल्याची हिंट दिली आहे.
झाले असे की, शिव हा बिग बॉस 16मध्ये सहभागी झाला आहे. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये शिव ठाकरेला अश्रू अनावर झाले आणि तो रडताना दिसला. नेहमीच खंबीर राहणाऱ्या शिवला रडताना पाहून सगळेच हैराण झाले आहेत. त्यानंतर आता वीणाने शिव ठाकरेला पाठिंबा दिला आहे.
नुकतंच वीणाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने शिवचा बिग बॉसच्या घरातील रडताना व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टबरोबर तिने शिवसाठी खास कॅप्शनही दिले आहे. “वाघ आहेस तू…. रडू नकोस अजिबात… मी आहे सोबत नेहमी” असे तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे. याबरोबर तिने रेड हार्ट इमोजीही शेअर केले आहे.
तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरात शिवला अश्रू अनावर झाले होते, त्याला एकटे वाटत असल्याने बिग बॉस त्याला म्हणत आहेत, "तुला कोणासोबत बोलायचे आहे? वीणाशी का? यावर हसत उत्तर देत शिव म्हणला, "आईही चालेल आणि वीनीही चालेल".
शिवचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावरूनच शिव आणि वीणा यांचे ब्रेकअप झाले नसल्याचे बोलले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.