आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कहाणीत ट्वीस्ट!:मृत घोषित केलेली अभिनेत्री वीणा कपूर जिवंत, स्वतः मुलासोबत गाठले पोलिस ठाणे आणि केला मोठा खुलासा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वीणा कपूर यांची त्यांच्या मुलानेच हत्या केल्याचे वृत्त आगीसारखे पसरले होते. सचिन कपूर नावाच्या मुलाने कोट्यवधीच्या फ्लॅटसाठी स्वतःच्या जन्मदात्या आईचा खून केल्याचे बोलले गेले. त्यानंतर आरोपी मुलाने आईचा मृतदेह माथेरान जंगलात फेकला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर मनोरंजनसृष्टीत मोठी खळबळ उडाली होती. पण आता या कहाणीत मोठा ट्वीस्ट आला आहे. अभिनेत्री वीणा कपूर जिवंत असून मृत महिला वेगळीच कुणीतरी असल्याचे समोर आले आहे. नावातील साधर्म्यामुळे मनस्ताप सहन करावा लागल्याचे अभिनेत्री वीणा कपूर यांनी म्हटले आहे. वीणा यांनी स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन त्यांच्या मृत्यूच्या अफवेबाबत तक्रार दाखल केली.

अभिनेत्री वीणा कपूर यांनी त्यांच्या मुलगा अभिषेक चड्ढासोबत पोलिस ठाणे गाठले.
अभिनेत्री वीणा कपूर यांनी त्यांच्या मुलगा अभिषेक चड्ढासोबत पोलिस ठाणे गाठले.

वीणा कपूर पोहोचल्या पोलिस ठाण्यात
वीणा कपूर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक युजर्सनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. एवढंच नाही तर त्यांच्या मुलाविरोधातही अनेकांनी संताप व्यक्त केला होता. अभिनेत्री नीलू कोहली यांनीदेखील सोशल मीडिया पोस्ट करुन वीणा कपूर या अभिनेत्री होत्या आणि त्यांच्यासोबत काही मालिकांमध्ये काम केल्याचे म्हटले होते. मात्र आता अभिनेत्री वीणा कपूर यांनी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलिस तपास सुरू करण्यात आला आहे.

मृत व्यक्तीचे आणि अभिनेत्रीचे नाव वीणा कपूर असल्याने ही अफवा पसरली. अभिनेत्री वीणा कपूर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करताना सांगितले की, "मी जिवंत आहे. मात्र माझ्याबद्दल सोशल मीडियावर चुकीचे वृत्त पसरवले जात आहे. सोशल मीडियावर मला श्रद्धांजली वाहण्यात आली आणि माझ्या मुलालाही अपमानित करण्यात आले आहे. यामुळे आमच्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला आहे."

वीणा कपूर यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्याची ही प्रत
वीणा कपूर यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्याची ही प्रत

पुढे त्या म्हणाला, "मी खूप त्रासले आहे. माझे फोटो व्हायरल झाले आहेत. मला लोक श्रद्धांजली वाहत आहेत. लोकांचे फोन येत आहेत. मला माझ्या कामावरही लक्ष देता येत नाहीये. त्यामुळे आता मी सर्वांना सांगू इच्छिते की, माझ्या मुलाने माझी हत्या केलेली नाही. मी जिवंत आहे आणि माझ्या निधनाचे वृत्त ही केवळ अफवा आहेत. या खोट्या अफवांमुळे मला काम मिळणे बंद झाले आहे," असेही वीण कपूर यांनी सांगितले.

वीणा कपूर यांच्या मुलानेही दिले विधान
वीणा यांचा मुलगा अभिषेक चड्ढा यांनीही स्पष्ट केले की, "ही बातमी पसरताच मला आईला मारल्याचे अनेक फोन आले होते. मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो आणि ही बातमी ऐकताच मी आजारी पडलो. हात जोडून मी विनंती करतो की माझी आई जिवंत आहे आणि मी तिला मारले नाही."

वीणा कपूर यांच्या को-स्टार नीलू कोहली काय म्हणाल्या होत्या?

वीणा कपूर यांच्या हत्येचे वृत्त समोर आल्यानंतर अभिनेत्री नीलू कोहली यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. आपल्या पोस्टमध्ये नीलू कोहली यांनी लिहिले होते, "वीणा कपूरजी तुम्ही यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी डिजर्व्ह करत होता. मी दुःखी आहे. तुमच्यासाठी ही पोस्ट लिहित आहे. काय बोलू? आज माझ्याकडे शब्द नाहीत. आशा करते की एवढ्या वर्षांच्या संघर्षांनंतर अखेर तुम्ही शांततेत आराम करत असाल. जुहू भागातील हा तो बंगला आहे जिथे ही धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या 74 वर्षीय आईची बेसबॉलच्या बॅटचा वापर करून हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह माथेरान येथे फेकला. मात्र अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या दुसऱ्या मुलाला याची शंका आली आणि त्याने जुहू पोलिसांना याबाबत अलर्ट केले."

अभिनेत्री नीलू कोहली यांची इन्स्टाग्राम पोस्ट
अभिनेत्री नीलू कोहली यांची इन्स्टाग्राम पोस्ट

पोलिसांनी मृत महिलेच्या मुलाला ठोकल्या बेड्या

वीणा कपूर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. मुलाने बेसबॉलच्या बॅटने आई वीणा कपूर यांची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली होती. सचिन कपूर आणि त्याचा साथीदार लालू कुमार मंडल असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलाने जुहू भागातील 12 कोटी रुपयांचा फ्लॅट मिळवण्यासाठी आपल्या आईची हत्या केली. वीणा कपूर यांची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह कार्टनमध्ये पॅक केला आणि मुंबईपासून 90 किलोमीटर लांब माथेरानच्या जंगलात फेकला.

  • वीणा कपूरच्या मुलाची कबुली - मारहाण करून केली आईची हत्या:म्हणाला - मला दुष्ट आत्मा म्हणायची, सावत्र मुलासारखे वागवायची

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वीणा कपूर यांची त्यांच्या मुलानेच हत्या केल्याची घटना अलीकडेच उघडकीस आली. आता वीणा कपूर यांच्या आरोपी मुलाने पोलिसांसमोर हत्येचा कारणाचा खुलासा केला आहे. चौकशीत सचिनने सांगितले की, त्याची आई त्याला लहानपणापासून सावत्र मुलाप्रमाणे वागवत असे. ती त्याला दुष्ट आत्मा म्हणायची, एवढेच नाही तर सचिनच्या जन्मापासून वडिलांना खूप त्रास झाला आहे, असे ती म्हणायची. त्याच्या आईने कायम मोठ्या मुलाला साथ दिली. या सर्व कारणावरून आरोपी सचिनने आईची हत्या केली. वाचा सविस्तर...

  • धक्कादायक:मुलानेच केली प्रसिद्ध अभिनेत्री वीणा कपूरची हत्या, मृतदेह माथेरानच्या जंगलात फेकला; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबईतील जुहू भागात एका 74 वर्षीय महिलेची हत्या झाल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आले होते. जुहूमधील एका फ्लॅटमध्ये एका मुलाने स्वतःच्या 74 वर्षीय आईची हत्या केली. हत्या झालेली महिला टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री वीणा कपूर आहेत. वीणा यांची त्यांच्या मुलानेच राहत्या घरी निर्घृणपणे हत्या केली. इतकेच नाही तर त्यांचा मृतदेह माथेरानच्या जंगलात फेकला. आता त्यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. याची माहिती टीव्ही अभिनेत्री नीलू कोहली यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. वीणा कपूर यांनी 'मेरी भाभी' या मालिकेत भूमिका केली होती. या मालिकेत नीलू कोहली यांनी त्यांच्यासोबत काम केले होते. निलू कोहली यांनी विरल भयानी यांची एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...