आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईतील जुहू भागात एका 74 वर्षीय महिलेची हत्या झाल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आले होते. जुहूमधील एका फ्लॅटमध्ये एका मुलाने स्वतःच्या 74 वर्षीय आईची हत्या केली. हत्या झालेली महिला टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री वीणा कपूर आहेत. वीणा यांची त्यांच्या मुलानेच राहत्या घरी निर्घृणपणे हत्या केली. इतकेच नाही तर त्यांचा मृतदेह माथेरानच्या जंगलात फेकला. आता त्यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. याची माहिती टीव्ही अभिनेत्री नीलू कोहली यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. वीणा कपूर यांनी 'मेरी भाभी' या मालिकेत भूमिका केली होती. या मालिकेत नीलू कोहली यांनी त्यांच्यासोबत काम केले होते. निलू कोहली यांनी विरल भयानी यांची एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली.
नीलू कोहली यांनी एका न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले की, वीणा यांनी त्यांच्याबरोबर ‘मेरी भाभी’ या मालिकेत जवळपास 5 वर्षे काम केले होते. ही मालिका बंद झाल्यानंतर या दोघींनी आणखी एका मालिकेत एकत्र काम केले होते.
नीलू कोहली यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये नीलू कोहली यांनी लिहिले, "वीणा कपूरजी तुम्ही यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी डिजर्व्ह करत होता. मी दुःखी आहे. तुमच्यासाठी ही पोस्ट लिहित आहे. काय बोलू? आज माझ्याकडे शब्द नाहीत. आशा करते की एवढ्या वर्षांच्या संघर्षांनंतर अखेर तुम्ही शांततेत आराम करत असाल. जुहू भागातील हा तो बंगला आहे जिथे ही धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या 74 वर्षीय आईची बेसबॉलच्या बॅटचा वापर करून हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह माथेरान येथे फेकला. मात्र अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या दुसऱ्या मुलाला याची शंका आली आणि त्याने जुहू पोलिसांना याबाबत अलर्ट केले."
वीणा कपूर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. त्यांच्या मुलाने बेसबॉलच्या बॅटने आई वीणा कपूर यांची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली होती. सचिन कपूर आणि त्याचा साथीदार लालू कुमार मंडल असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलाने जुहू भागातील 12 कोटी रुपयांचा फ्लॅट मिळवण्यासाठी आपल्या आईची हत्या केली. वीणा कपूर यांची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह कार्टनमध्ये पॅक केला आणि मुंबईपासून 90 किलोमीटर लांब माथेरानच्या जंगलात फेकला. वीणा यांच्या मृत्यूने चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.