आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन, घरी झोपेतच घेतला अखेरचा श्वास; त्यांना कोणताही आजार नव्हता

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • झोपेतच प्राणज्योत मालवली

गतकाळातील दिग्गज अभिनेते चंद्रशेखर यांचे बुधवारी निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. 'रामायण' या मालिकेतील आर्य सुमंतच्या भूमिकेसाठी त्यांना ओळखले जात असे. CINTAA चे अनिल गायकवाड यांनी चंद्रशेखर यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. आज (बुधवारी) सकाळी सात वाजता त्यांनी झोपेतच अखेरचा श्वास घेतला.

झोपेतच प्राणज्योत मालवली
चंद्रशेखर यांचा मुलगा अशोक यांनी सांगितले, "वडिलांचे झोपेतच निधन झाले. त्यांना कोणत्यात प्रकारचा आजार नव्हता. गेल्या काही दिवसांपासून त्यांना ताप असल्याने आम्ही त्यांना गुरुवारी जुहू स्थित क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र त्यानंतर त्यांचा ताप उतरला आणि त्यांना एका दिवसांतच आम्ही घरी आणले. आम्ही घरीच त्यांच्यासाठी रुग्णालयाप्रमाणे सर्व व्यवस्था केली होती. आयुष्यातील शेवटचे क्षण आपल्या कुटुंबासोबत घालवावेत, अशी त्यांची इच्छा होती."

आज दुपारी चार वाजता विलेपार्लेस्थित पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चंद्रशेखर हे टीव्ही अभिनेता शक्ती अरोरा यांचे आजोबा होते. 2019 मध्ये शक्तीने त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता.

चंद्रशेखर 11 वर्षे CINTAAचे अध्यक्ष होते
CINTAA चे सहसचिव अमित बहल म्हणाले, 'त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रशेखर सर, आशा पारेख, मिथुन दा, अमरीश पुरी, अमजद खान आणि राम मोहन यांनी आमच्या नवीन कार्यालयीन इमारतीसाठी सरकारकडून जागा घेतली होती. ही इमारत लवकरच तयार होईल. त्याच्या उद्घाटनाच्या वेळी आम्ही त्यांच्या उपस्थितीची वाट पाहत होता, पण नशिबाने दुसरेच काही मांडून ठेवले होते," अशा शब्दांत बहल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. चंद्रशेखर यांनी 1985 ते 1996 या काळात सिने आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष (CINTAA) पद भूषवले होते.

चंद्रशेखर यांनी सुमारे 250 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या
ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 250 चित्रपटांत काम केले होते. हीरो म्हणून त्यांचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट ‘सूरंग’ हा होता. हा चित्रपट 1953 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यांनी 'गेट वे ऑफ इंडिया', 'फॅशन' (1957), 'बरसात की रात' (1960) आणि इतर बर्‍याच चित्रपटांमध्ये सहायक अभिनेता म्हणून काम केले होते आणि ते खूप लोकप्रिय झाले होते. त्यांनी 'चा चा चा' (1964) या हिट म्युझिकल चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यांनी स्वत: हा चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि सोबतच निर्मितीही त्यांचीच होती. या चित्रपटाच हेलन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हेलन यांचा हा डेब्यू चित्रपट होता.

बातम्या आणखी आहेत...