आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनच्या काळात:84 वर्षीय धर्मेंद्र यांनी फार्महाऊसवर ट्रॅक्टरने नांगरले शेत, म्हणाले - 'यामुळे थोडासा व्यायाम होतो'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धर्मेंद्र यांनी चाहत्यांना सामाजिक अंतर राखून घरी राहण्याचे आवाहन केले होते.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र मुंबई जवळील आपल्या फार्महाऊसमध्ये लॉकडाऊनचा काळ घालवत आहेत. 84 वर्षीय धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे आणि आपल्या लॉकडाऊन लाइफशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसमवेत शेअर करत आहे. अलीकडेच त्यांनी एक 18 सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते ट्रॅक्टरवर बसून आपल्या शेतात नांगरताना दिसत आहे. धर्मेंद्र व्हिडिओत म्हणतात, मित्रांनो कसे आहात तुम्ही, इतके छोटे शेत आहे की कशीबशी नांगरणी करतो, त्यात थोडासा व्यायामही होतो.

  • कॅप्शनमध्ये लिहिले कोरोनाला पराभूत करायचे आहे

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये धर्मेंद्र यांनी कोरोनाव्हायरसचा पराभव करण्याचा संदेश दिला आहे. त्यांनी लिहिले, 'कोरोनाविरूद्धच्या युद्धात मला तुम्हा सर्वांना प्रोत्साहित करायचंय, कोरोनाव्हायरस माहित आहे की तुम्ही शूर आहात...' 

  • कोरोना हे आपल्या दुष्कर्मांचे फळ आहे: धर्मेंद्र

यापूर्वी धर्मेंद्र यांनी चाहत्यांना सामाजिक अंतर राखून घरी राहण्याचे आवाहन केले होते. धर्मेंद्र म्हणाले होते, "मित्रांनो आज आपण  आपल्या पापाची शिक्षा भोगत आहो, मित्रांनो. हे कोरोना आपच्या दुष्कर्माचे फळ आहे. जर आपण मानवतेवर प्रेम केले असते तर ही वेळ कधीच आली नसती. आजच यापासून धडा घ्या. एकत्र राहा, मानवतेवर प्रेम करा. मानवता जिवंत ठेवा." पुढे, धर्मेंद्र यांनी हात जोडून   भावनिकरित्या म्हणाले, "आज मी हे फार दु:खी होऊन म्हणतोय. त्याच्यासाठी (देवासाठी), स्वतःसाठी, आपल्या मुलांसाठी, जगासाठी, मानवतेसाठी एकत्रित व्हा."

बातम्या आणखी आहेत...