आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडवर शोककळा:ज्येष्ठ अभिनेते-चित्रपट निर्माते ललित बहल यांचे कोरोनामुळे निधन, गेल्या आठवड्यात रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात करण्यात आले होते दाखल

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ललित बहल यांना हृदयविकाराचा होता त्रास

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते ललित बहल यांचे वयाच्या 71 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या आठवड्यात कोविड 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ही माहिती त्यांचा मुलगा दिग्दर्शक कानु बहल यांनी दिली.

ललित बहल यांना हृदयविकाराचा होता त्रास कानु बहल यांनी सांगितल्यानुसार, ‘त्यांना आधीच हृदयाच्या समस्या होत्या. त्यात गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली. ज्यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिकट झाली. फुफ्फुसांमध्ये संसर्ग वेगाने पसरत होता, त्यामुळे त्यांचे प्राण वाचवता आले नाही.’

ललित 'जजमेंटल है क्या'मध्ये दिसले होते

ललित बहल दुरदर्शनच्या ‘तपिश’, ‘आतिश’, 'सुनहरी जिल्द' सारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्माते होते. त्यांनी छोट्या पडद्यावरील ‘अफसाने’ या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली होती. अलीकडच्या काळात ते 'जजमेंटल है क्या', 'तितली' आणि 'मुक्ति भवन' या चित्रपटांमध्ये झळकले होते. 2014 मध्ये आलेला 'तितली' हा चित्रपट त्यांचा मुलगा कानु बहलने दिग्दर्शित केला होता. याशिवाय ललित यांनी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या ‘मेड इन हेवन’ या चित्रपटांतही भूमिका साकारली होती.

बातम्या आणखी आहेत...