आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

प्रकृती खालावली:ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमरने ग्रासले, मुलगा अजिंक्य देवने चाहत्यांना आईसाठी प्रार्थना करण्याची केली विनंती

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांची प्रकृती खालावली आहे. सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास आहे. सीमा यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

अजिंक्य देव यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘माझी आई सीमा देव अल्झायमर या आजाराशी लढा देत आहे. आम्ही संपूर्ण देव कुटुंबीय ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्राने जे तिच्यावर भरभरून प्रेम केले त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनीही तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना कराव्यात.' अजिंक्य यांच्या ट्विटनंतर चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करणारे ट्विट केले आहेत.

अभिनेत्री सीम देव आणि त्यांचे पती अभिनेते रमेश देव हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील अतिशय नावाजलेले कलाकार आहेत. सीमा देव यांनी राजा परांजपे दिग्दर्शित 'जगाच्या पाठीवर' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. सुवासिनी, आनंद अशा नावाजलेल्या सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर कायमचा उमटवला. त्यांना दोन मुले आहेत. थोरला मुलगा अभिनय देव हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. तर दुसरा मुलगा अजिंक्य देव चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते आहेत.

अल्झामयर म्हणजे काय?
अल्झायमर आजारात विसरभोळेपणा वाढत जातो. सुरुवातीला नाव विसरणे, जेवण खाणे विसरणे अशाप्रकारे लक्षणांमध्ये वाढ होत जाते. 65 वर्षे वयानंतर शेकडा 20 टक्के लोकांमध्ये अल्झायमर होण्याची शक्यता असते असा निष्कर्ष अभ्यासातून समोर आहे. अल्झेमर्सची सुरुवात मेंदूमध्ये झाल्यानंतर जवळपास दहा वर्षे उलटल्यानंतर मगच सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात असा शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे.