आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय चित्रपटसृष्टीने गमावला मौल्यवान 'कोहिनूर':ट्रॅजेडी किंगसाेबत सर्वाधिक 8 चित्रपट करणाऱ्या अभिनेत्री वैजयंतीमाला म्हणाल्या - दिलीप साहेबांनी भोजपुरी शिकवल्याने उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला

उमेश कुमार उपाध्यायएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री वैजयंतीमाला यांच्या नजरेतून त्यांचे व्यक्तिमत्त्व जाणून घ्या...

'मोहब्बत हमने माना जिंदगी बर्बाद कर देती है, ये क्या कम है कि मर जाने के बाद दुनिया याद करती है...' चित्रपट मुगल-ए-आझममधील हा संवाद दिलीपकुमार यांच्या जीवनाबाबत खरा ठरतो. त्यांचा सिनेप्रवास 1944 ते 1998 पर्यंत राहिला. हा प्रवास अनेक कारणांवरून लोकांच्या स्मरणात राहील. या विशेष लेखात त्यांच्या सहकारी राहिलेल्या अभिनेत्री वैजयंतीमाला यांच्या नजरेतून त्यांचे व्यक्तिमत्त्व जाणून घ्या...

'आम्ही 8 चित्रपटांत एकत्र काम केले. सर्वच चित्रपट यशस्वी आणि सुपरहिट ठरले. प्रत्येक वेळेस ते मला म्हणत, आपली टीम बेस्ट टीम आहे. आम्ही एकमेकांना समजून घेत होतो. दिलीपजी सोबत 'देवदास’ माझा पहिला चित्रपट होता. त्याच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी घाबरले होते. ते खूप मोठे अभिनेते होते आणि मी एक डान्सिंग स्टार होते. प्रत्येक चित्रपटात डान्स करत होते. पण इतक्या मोठ्या नटासमोर मला अभिनय करायचा होता, त्यामुळे घाबरले होते. ते नेहमीच आपल्या भूमिकेविषयी समर्पित राहायचे. मीदेखील त्यांच्याप्रमाणेच आपले काम मनापासून करत होते.'

'गंगा जमुना’साठी मला भोजपुरी शिकवण्यात त्यांची खूप मदत झाली. मी दक्षिणेकडची होते. मला हिंदीच बोलण्यातच अडचणी येत, त्यावर भोजपूरी बोलणे अवघड होते. त्यामुळे भोजपुरी भाषा कशी बोलायची, शब्द कसे ओळखायचे, सर्व काही रिकॉर्ड करुन पाठवत असत. अशा प्रकारे त्यांनी माझी मदत केली. त्यांच्यामुळेच मला 'गंगा जमुना’मध्ये धन्नोच्या पात्रासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.'

'नया दौर’च्या काळात भोपाळमध्ये शूटिंग करत होतो. त्यांच्यासोबत माझे एक गाणे होते. त्यासाठी टांगा चालवण्याचा सराव करण्यासाठी रोज संध्याकाळी दिलीप साहेब जात होते. त्यांचे समर्पण पाहण्याजोगे होते. नंतर मी जेव्हा मुंबईला यायचे तेव्हा घेण्यासाठी सायराजी गाडी पाठवत होत्या. आम्ही सोबत वेळ घालवायचो. एकदा त्यांच्या घरी गेले होते, तेव्हा सायराजी त्यांना म्हणाल्या, कोण आले पाहा...मधुमतीजी आल्या आहेत... तेव्हा त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही मात्र सायराजीने धन्नो आल्याचे म्हणाल्यावर त्यांनी एकदम डोळे उघडले होते. मला आजही तो क्षण आठवतो.'

बातम्या आणखी आहेत...