आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपूर्ण इच्छा:वडिलोपार्जित हवेलीला संग्रहालयाच्या रुपात बघू इच्छित होते दिलीप कुमार, पाकिस्तान सरकार आणि विद्यमान मालकांमध्ये अडकले प्रकरण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानच्या फाळणीच्या अगोदर भारतीय सिनेमांचे श्रेष्ठ कलाकार या ठिकाणी जन्मले आणि वाढले होते.

दिलीपकुमार यांची वडिलोपार्जित हवेली 2014 मध्ये आणि राज कपूर यांचीही वडिलोपार्जित हवेली 2018 मध्ये पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केली होती. दोन्ही हवेली पेशावर शहरातील किस्सा ख्वानी बाजार येथे आहेत. आता या दोन्ही इमारती खिळखिळ्या झाल्या आहेत. त्या कधीही कोसळू शकतात. खैबर-पख्तुनख्वाचे पुरातत्त्व विभागाचे प्रमुख डॉ. अब्दुस समद खान यांनी सांगितले होते की, फाळणीपूर्वी भारतीय सिनेमाच्या या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले आहे.

पाकिस्तानमधील खैबर-पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने पुढाकार घेत या हवेलींचे रुपांतर संग्रहालयात करण्याचा निर्णय घेतला होता. हवेलीच्या विद्यमान मालकांना यासाठी 18 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. पण, वडिलोपार्जित हवेलीचे संग्रहालयात रुपांतर होण्याआधीच दिलीप साहेबांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या अगोदर भारतीय सिनेमांचे श्रेष्ठ कलाकार या ठिकाणी जन्मले आणि वाढले होते.

किंमतींमुळे नाराज होते हवेलीचे विद्यमान मालक
राज कपूर यांचे वडिलोपार्जित घर कपूर हवेली म्हणून ओळखली जाते. ही हवेली किस्सा ख्वानी बाजारात आहे. राज कपूर यांचे आजोबा दिवाण बेश्वरनाथ कपूर यांनी 1918 ते 1922 या काळात बनवले होते. राज कपूर आणि त्यांचे काका त्रिलोक यांचा जन्म याच घरात झाला होता. दिलीप कुमार यांचं घरही याच भागात असून सुमारे 100 वर्ष जुनं आहे.

दिलीप कुमार यांच्या माेडकळीस आलेल्या या घरात लोक चक्क कचरा फेकत असल्याचे चित्र आहे. मालकांनीही या घराकडे लक्ष देणे बंद केले आहे. राज कपूर यांच्या वडिलोपार्जित कपूर हवेलीची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. 40 ते 50 खोल्या असलेल्या राज कपूर यांच्या 5 मजली इमारतीच्या वरच्या व चौथ्या मजल्याची पडझड झाली आहे.

राज कपूर यांची हवेली जी खरेदी करण्यासाठी 1.50 कोटी दिले गेले.
राज कपूर यांची हवेली जी खरेदी करण्यासाठी 1.50 कोटी दिले गेले.

इमारतही खिळखिळी झाली आहे. 2014 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या घरांना राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले होते. पण त्याचे संरक्षण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. इतकेच नाही तर 2018 मध्येही राज्य सरकारने ही दोन्ही घरे खरेदी करून त्यांचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी निधी देण्याचे जाहीर केले होते.

कपूर हवेलीचे मालक हाजी इसरार शाह म्हणाले की, राज कपूर यांच्या हवेलीचे मालक असल्याचा मला अभिमान आहे. सरकारने हे घर खरेदी करून संग्रहालय बनवले तर मला खूप आनंद होईल. पण हे शक्य झाले नाही तर मी या जागी बहुमजली सिनेमागृह उभारेन. हवेलीशेजारी राहणारे व माजी महापौर अब्दुल हकिम सफी म्हणाले होते की, ही हवेली 12 वर्षांपासून भूतबंगला झाली आहे. ही हवेली मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत न ठरो अशी भीती लोकांना आहे. दिलीप कुमार यांच्या घराच्या मालकाने सरकारकडे 200 कोटींची मागणी केली आहे. या घरांची किंमत निश्चित करण्याचे काम आम्ही करत आहोत असे शहराच्या उपायुक्तांनी सांगितले होते. खैबर पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांनी 4 महिन्यांपूर्वी सुमारे 2.35 कोटी रुपये दिले आहेत.

सोहळ्यांसाठी कपूर हवेली 6 महिने वेटिंगवर असायची
लग्नाच्या पार्टीसाठी या हवेलीला लोकांची पहिली पसंती असायची. नियाज शहा म्हणाले होते की, हवेलीत बुकिंग मिळाले नाही तर मुलीचे लग्न 6 महिने लांबणीवर टाकले जात. २००५ च्या भूकंपात हवेलीचे नुकसान झाले आणि हे सर्व कार्यक्रम बंद झाले.

बातम्या आणखी आहेत...