आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाने हिरावला प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर:'रहना है तेरे दिल में'सह अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सिनेमॅटोग्राफर जॉनी लाल यांचे निधन, लॉकडाउनपुर्वी पर्यंत करत होते शूटिंग

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 21 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

चित्रपटसृष्टीतील दिग्गज सिनेमॅटोग्राफर जॉनी लाल यांचे निधन झाले आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. दोन आठवडे कोरोनाशी झुंज दिल्यानंतर 21 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. जॉनी लाल यांनी आर माधवन स्टारर 'रहना है तेरे दिल में', गोविंदा-सलमान खान स्टारर 'पार्टनर' आणि हृतिक रोशन स्टारर 'यादें' यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी काम केले होते. वेस्टर्न इंडिया सिनेमॅटोग्राफर असोसिएशनचे सरचिटणीस राजन सिंह यांनी जॉनी लाल यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

लॉकडाऊनपुर्वी पर्यंत करत होते शूटिंग
एका इंग्रजी न्यूज वेबसाइटशी बोलताना राजन म्हणाले, "जॉनी लाल यांनी काल मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ते लॉकडाउनपूर्वी पर्यंत काही प्रोजेक्टचे शूटिंग करत होते. काही आठवड्यांपूर्वी त्यांची कोविड - 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उपचारादरम्यान काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांचे निधन झाले.'

आर माधवन आणि तुषार कपूर यांनी काय लिहिले?

जॉनी लाल यांच्या मृत्यूनंतर आर माधवन, तुषार कपूर सारख्या अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. दुःख व्यक्त करताना माधवन म्हणाला, 'काही ना काही वाईट घडतच आहे आणि आम्ही एक खूप चांगला माणूस आज गमावला. तुमच्यातल्या गुणांमुळे तुम्ही कायम लक्षात राहाल. तुम्ही ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून आमच्यातलं सर्वोत्तम बाहेर काढलंत… आता स्वतः स्वर्गाकडे मार्गस्थ झाला आहात.'

अभिनेता तुषार कपूरनेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटात प्रमुख भूमिका केली आहे. आपल्या भावना व्यक्त करताना तुषार म्हणाला, 'भावपूर्ण श्रद्धांजली जॉनी सर! आजही जो तरुण वाटतो असा ‘मुझे कुछ कहना है’ चित्रपट बनवल्याबद्दल तुमचे आभार. माझ्या चित्रपटातल्या माझ्या चुकांना सांभाळून घेतल्याबद्दल तुमचे आभार.'

जॉनी लाल यांनी केलेले काही चित्रपट
जॉनी लाल यांनी 'रहना है तेरे दिल में', यादें' आणि 'मुझे कुछ कहना है' शिवाय 'पार्टनर', 'वीरे की वेडिंग', 'जीना सिर्फ मेरे लिए', ' शादी से पहले', 'शादी नं. 1', 'ओम जय जगदीश', 'फूल एंड फाइनल', 'लकीर', 'वादा', 'हॉर्न ओके प्लीज' आणि 'वेलापंथी इश्केरिया' या चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफी केली होती.

बातम्या आणखी आहेत...