आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय चित्रपटसृष्टीने गमावला मौल्यवान 'कोहिनूर':आपल्या ‘कोहिनूर’सोबत प्रत्येक क्षण जगल्या सायरा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वरिष्ठ पत्रकार आणि चित्रपट समीक्षक प्रदीप सरदाना यांच्या लेखणीतून...

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे 7 जुलै रोजी वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या पत्नी सायरा बानो कोलमडून गेल्या आहेत. वरिष्ठ पत्रकार आणि चित्रपट समीक्षक प्रदीप सरदाना यांनी दिलीप साहेब आणि सायरा यांच्या नात्याविषयी बोलताना म्हटले की, सायरा आपल्या ‘कोहिनूर’सोबत प्रत्येक क्षण जगल्या.

प्रदीप सरदाना लिहितात, 'दिलीपकुमार 11 जून रोजी रुग्णालयातून बरे होऊन घरी परतले होते तेव्हा सायरा बानो प्रचंड खुश होत्या. मी त्यांना त्यासाठी शुभेच्छादेखील दिल्या होत्या. यावर त्या म्हणाल्या होत्या...‘इंशा अल्लाह... दुआ करो अल्लाह युसुफजान को सेहतयाब रखे. आमीन..’ दिलीप साहेबांच्या तब्येतेची सायरा खूप काळजी घ्यायच्या. दिलीप साहेबांसोबत त्यांनी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने, प्रेमाने जगला. '

'दिलीप साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी त्या काहीही करायला तयार राहत. त्या प्रकारे त्या दिलीप कुमार साहेबांची काळजी घ्यायच्या, ते पाहून दिलीप साहेब पुढच्या वर्षी 100वा वाढदिवस साजरा करतील, असे वाटत होते. मात्र दिलीप साहेब शंभरी पार करु शकले नाहीत. आजाराने ग्रस्त असूनही त्यांनी 98 गाठले होते. यातही सायरा बानो यांचे मोठे योगदान राहिले. गेल्या काही वर्षात दिलीपकुमार तब्येत बिघडल्यामुळे अनेकदा रुग्णालयात दाखल झाले मात्र प्रत्येक वेळेस चमत्कारिक पद्धतीने बरे होऊन घरी परत येत.'

'दिलीप कुमार–सायरा बानो यांनी 11 ऑक्टोबर 1966 मध्ये लग्न केले होते. वैवाहिक जीवनाचे 55 वर्ष सायराने पूर्णपणे ‘साहेब’ला समर्पित केले होते. गेल्या 10 वर्षापासून तर सायरा त्यांच्या आईची भूमिका साकारत होती.'

'सायरा सांगतात, मी दिलीप साहेबांना ‘साहब’ किंवा ‘कोहिनूर’ म्हणून संबोधित करत होते. ते सायराच म्हणत होते. साहेबांसोबत घालवेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी देवाचा आशीर्वाद आहे. त्यांच्यासोबत घालवेला प्रत्येक क्षण मला आठवतो. मग ते बॅडमिंटन खेळणे असो, त्यांच्यासेाबत लाँग ड्राइव्हवर जाणे असो. खरंतर, 76 वर्षीय सायरासाठी एकाकी जीवन जगणे अवघड होईल. त्यांचा कोहिनूर गेल्यानेे त्यांच्या बंगल्यातूनच नव्हे तर जीवनातूनही चमक निघून गेली आहे.'

बातम्या आणखी आहेत...