आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकी-कतरिनाचे लग्न:कतरिना कैफच्या लग्नाच्या वेळी चित्रीकरणात बिझी राहणार आहे सलमान खान, कतरिनाकडून अद्याप खान कुटुंबाला आमंत्रण नाही

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कतरिनाची लग्नाची तारीख निश्चित कळली नसल्याने सलमानने शूटिंगच्या तारखा बदलल्या नाहीत.
  • लग्नानंतर रिसेप्शनमध्ये सहभागी होऊ शकतो, रखडलेल्या प्रोजेक्ट्सना विलंब करणे शक्य नाही
  • 7-8 डिसेंबरला टायगर 3 चे शूटिंग करणार आहे सलमान

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा लग्न सोहळा 7 डिसेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या लग्नात कतरिनाचा जवळचा मित्र सलमान खान वगळता तिचे अनेक मित्र उपस्थित राहणार आहेत. दोघांच्या निकटवर्तीयांनी दैनिक भास्करकडे याची पुष्टी केली आहे.

एका जवळच्या मित्राने सांगितले की, 'सलमान त्याच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. असं असलं तरी, आतापर्यंत औपचारिक निमंत्रण देण्यात आलेले नाही. आत्तापर्यंत कतरिनाने याबाबत चर्चा केलेली नाही आणि खान कुटुंबातील कोणत्याही सदस्याला आमंत्रित केले नाही. अशा परिस्थितीत त्यांचे लग्न नेमके कधी होणार हे ठरलेले नाही. तारखेच्या अनिश्चिततेमुळे सलमानने लग्नानंतरच्या रिसेप्शनला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.'

निकटवर्तीयाने सलमानच्या बिझी शेड्युलबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, 'सलमान 7 आणि 8 डिसेंबरला मुंबईत 'टायगर 3'चे शूटिंग करत आहे. 9 डिसेंबरला सलमान रियाधला रवाना होणार आहे. तेथे तो 10 डिसेंबरपर्यंत दबंगचा कार्यक्रम आयोजित करणार आहे. 11 डिसेंबरला परतल्यानंतर अभिनेता 'बिग बॉस 15' च्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. अशा स्थितीत तो कतरिनाच्या कथित लग्नात सहभागी होणार की नाही, याबाबत काहीही निश्चित नाही.'

कतरिना कैफ दबंगचा भाग नाही. तसेच, 7, 8 आणि 9 डिसेंबर रोजी 'टायगर 3'चे तिच्या शूटचे शेड्यूलिंग अद्याप येणे बाकी आहे. वेळापत्रक आल्यानंतर ठरवले जाईल की लग्न खरंच आहे की नाही?

राजस्थानमध्ये सुरु झाली लग्नाची तयारी
राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेंस फोर्टवर विकी आणि कतरिनाचा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. दरम्यान, त्यांच्या लग्नाची बातमी मीडियात आल्यानंतर या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या लग्नातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सुरक्षा व्यवस्थेवर तब्बल 15 लाखांचा खर्च केला जाणार आहे. बातमीनुसार, विकी आणि कतरिना 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान एका तारखेला लग्न करणार आहेत. हे डेस्टिनेशन वेडिंग आहे. व्हीआयपी लग्नाची तयारी येथे सुरू झाली आहे.

दिवाळीत झाली होती विकी-कतरिनाची रोका सेरेमनी
यावर्षी दिवाळीच्या खास मुहूर्तावर दिग्दर्शक आणि कतरिनाचा मानलेला भाऊ कबीर खान यांच्या घरी कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची रोका सेरेमनी पार पडली होती. रिपोर्टनुसार, कतरिनाची आई सुझान टरकोट आणि बहीण इसाबेल कैफ या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. तर विकीच्या वतीने या रोका सेरेमनीत त्याचे आई-वडील वीणा कौशल आणि श्याम कौशल आणि भाऊ सनी कौशल उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...