आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकतरिना कैफ आणि विकी कौशल 9 डिसेंबरला राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर विकी-कतरिनाने त्यांच्या शाही लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. आता नुकतेच कतरिनाने लग्नाचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिच्या बहिणींसोबत फुलांच्या चादरीखालून लग्न मंडपाकडे जाताना दिसतेय. लाल रंगाचा वेडिंग आउटफिट कतरिनाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसतेय. या फोटोंसह कतरिनाने तिच्या बहिणींसाठी एक इमोशनल नोटही लिहिली आहे.
आम्ही सर्व बहिणींनी नेहमीच एकमेकींचे रक्षण केले आहे: कतरिना
फोटो शेअर करताना कतरिनाने लिहिले, "मोठ्या होत असताना, आम्ही सर्व बहिणींनी कायमच एकमेकींचे रक्षण केले आहे. त्या सर्व माझ्या शक्तीचा आधारस्तंभ आहेत आणि आम्ही एकमेकांना जमिनीशी जोडून ठेवते. मी प्रार्थना करते की हे सर्व कायम असेच राहो." फोटोंमध्ये कतरिना तिच्या बहिणी इसाबेल, मेलिसा, सोनिया, नताशा, क्रिस्टीन आणि स्टेफनीसोबत दिसत आहे.
कतरिनासाठी तिच्या बहिणींनी हा विधी पूर्ण केला
कतरिनाला तिच्या लग्नाच्या दिवशी लग्नमंडपापर्यंत नेण्याची जबाबदारी तिच्या भावाने नव्हे तर बहिणींनी पार पाडली. पंजाबी लग्नांमध्ये भाऊ त्याच्या बहिणीला ओढणी किंवा फुलांच्या चादरीखालून वराकडे घेऊन जातो. पण, कतरिनासाठी तिच्या बहिणींनी हा विधी पार पाडला. कतरिना कैफसाठी हा क्षण खूप खास होता.
कतरिना कैफने सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्से फोर्ट हॉटेलमध्ये अभिनेता विकी कौशलसोबत लग्न थाटले. या लग्नात कतरिनाच्या बहिणींनी विधी पार पाडले, तर तिचा भाऊ सेबस्टियननेही लग्नात विकी कौशलच्या कुटुंबाचे स्वागत केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.