आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटिंग रिपोर्ट:2 फेब्रुवारी पासून महेश्वरमध्ये सुरु होणार विकी कौशल आणि मानुषी छिल्लरच्या चित्रपटाची शूटिंग, हॉटेल ते सेटपर्यंत असणार बायो बबल

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 90 ते 110 लोकांचे युनिट 30 हॉटेल्समध्ये असेल वास्तव्याला
  • शूटिंगनंतरच विकी आणि मानुषी फिरायला जाऊ शकतील

चित्रपट आणि वेब शोच्या शुटिंगसाठी मध्य प्रदेश एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. विद्या बालनच्या 'शेरनी' चित्रपटाचे शूटिंग तेथे सुमारे महिन्याभरापूर्वी झाले होते. अलीकडच्या काळात 'धाकड' या चित्रपटाचे शूट चालू आहे. आता 2 फेब्रुवारीपासून विक्की कौशल आणि मानुषी छिल्लरही त्यांच्या पुढच्या चित्रपटाच्या शूटसाठी तेथे पोहोचत आहेत. हा यशराज बॅनरचा चित्रपट असून मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याची घोषणा झाली होती. एमपीच्या महेश्वर येथे चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून 90 ते 110 जणांची टीम महेश्वरला पोहोचत आहे. 30 हॉटेल्समध्ये बुकिंग केले गेले आहे. बायो बबल तयार केला जात आहे. म्हणजेच संपूर्ण टीमला बाहेरील लोकांच्या संपर्कातून दूर राहावे लागेल. विकी आणि मानुषी स्वतः शूटिंग पूर्ण केल्यावरच महेश्वर, ओंकारेश्वर येथे फिरायला जाऊ शकतील.

यासाठी करण्यात आली महेश्वरची निवड
चित्रपटाचे संपूर्ण वेळापत्रक 15 ते 20 दिवसांचे आहे. मुळात ओंकारेश्वर, महेश्वर यासारख्या ठिकाणी रोमँटिक सीन आणि गाण्यांचे चित्रीकरण केले जाईल. दोघांमध्ये काही ड्रामा सीन्सही शूट करण्यात
येणार आहे. वास्तविक या ठिकाणांचे लँडस्केप चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य यांनी पसंत आले होते. दृश्यामध्ये येथील स्थानामुळे व्हिज्युअली खूप चांगली भर पडू शकते. यामुळे त्यांनी
महेश्वरमध्ये शूट करण्याचे ठरवले.

मोठ्या कलाकारांपैकी अक्षय कुमार, सलमान खान, कंगना रनोट, हेमामालिनी, धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल, सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन, ईशान खट्टर आदी कलाकारांनी इथे शूट केले आहे.

एमपी गव्हर्मेंटने शूटिंगसाठी उत्तम व्यवस्था केली

कोविडचे वातावरण असूनही मध्य प्रदेश सरकारने शूटिंगची चांगली व्यवस्था केल्यामुळे विजय कृष्णा आचार्य आणि त्यांची टीमसुद्धा खूश आहे. त्यामुळे यापूर्वीही येथे कोणत्याही अचडणींशिवाय चित्रपट आणि वेब शोचे शूटिंग झाले आहे. शिवाय कोणत्याही सेटवरुन कोविडची प्रकरणे समोर आलेली नाहीत.

बातम्या आणखी आहेत...