आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्व्हर स्क्रीनवरील नवीन जोडी:विकी कौशलसोबत झळकणार सारा अली खान, 'जरा हटके जरा बचके' असू शकते चित्रपटाचे शीर्षक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता विकी कौशलने नुकतेच मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' या बायोपिकचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. आता लवकरच तो मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या 'छावा' या नवीन चित्रपटावर काम सुरू करणार आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून याच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विकी कौशलचे हे दोन्ही बिग बजेट चित्रपट आहेत. याशिवाय विकीकडे मॅडॉक बॅनरचाच आणखी एक चित्रपट असून त्याचे शीर्षक 'जरा हटके जरा बचके' किंवा 'घर घर की बात' यापैकी एक असू शकते. या चित्रपटाचे अंतिम शीर्षक काय असेल याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.

निर्माते योग्य तारखेच्या प्रतिक्षेत
मॅडॉक बॅनरच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात विकीसोबत सारा अली खान झळकणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. यामध्ये विकी इंदूरच्या तरुणाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी त्याने इंदोरी टोनमध्ये हिंदी बोलण्याचा सरावदेखील केला. यासाठी विकीने प्रतीक्षा नय्यर यांच्याकडून धडे गिरवले.

सारा-विकीचा हा चित्रपट एका सामाजिक विषयावर भाष्य करणारा
साराचे पात्र मुळचे इंदूरचे ठेवण्यात आलेले नाही. यात राकेश बेदी तिच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. इंदूरमध्ये दोन ते अडीच महिने या चित्रपटाचे शूटिंग झाले. उर्वरित 25 दिवसांचे शूटिंग मुंबईत झाले. 2021 मध्येच त्याचे शूटिंग पूर्ण झाले होते. चित्रपटातील काही दृश्ये विकीच्या लग्नानंतर शूट करण्यात आली होती.

ट्रेड पंडितांनी सांगितल्यानुसार, हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करण्यात येणार आहे. याचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. यावर्षी मे किंवा जूनपर्यंत हे काम पूर्ण होईल.

'जरा हटके जरा बचके' या गाण्यांचे सुरू आहे मिक्सिंग
सध्या चित्रपटातील गाण्यांच्या मिक्सिंगचे काम सुरू आहे. मॅडॉकसाठी गाणी तयार करणारे सचिन जिगर हेच याचे संगीतकार आहेत. यात सर्व गाणी फ्रेश आहेत. अमिताभ भट्टाचार्य यांनी ही गाणी लिहिली आहेत. हा चित्रपट यावर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

यशराजच्या चित्रपटात विकी
याशिवाय विकीकडे यशराज बॅनरचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' नावाचा आणखी एक मध्यम बजेट चित्रपट आहे. यात त्याच्यासोबत मानुषी छिल्लर झळकणार आहे. या चित्रपटाचेदेखील शूटिंग पूर्ण झाले आहे. सध्या त्याची रिलीज डेट निश्चित नाही. दीड वर्षांहून अधिक काळ हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.