आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड अनलॉकिंग:पुन्हा कामावर परतला आहे अभिनेता विक्की कौशल, 8 जूनपासून सुरु झाले 'सरदार उधम सिंग'चे पोस्ट प्रॉडक्शन

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विक्कीने लिहिले- वी बीगेन अगेन

बॉलिवूडमध्ये टीव्ही आणि चित्रपटाचे शूटिंग, टेक्निकल वर्क आणि पोस्ट प्रॉडक्शनसारखी कामं गेल्या 19 मार्चपासून बंद आहेत. पण आता हळूहळू लॉकडाऊन अनलॉक व्हायला सुरुवात झाली आहे. चित्रीकरण आणि त्यासंबंधित इतर कामांना आता सशर्त परवानगी मिळाली आहे. दरम्यान अभिनेता विक्की कौशलने इंस्टाग्रामवर त्याच्या आगामी 'शहीद सरदार उधम सिंग' या चित्रपटाशी संबंधित बातमी शेअर केली आहेत.

  • विक्कीने लिहिले- वी बीगेन अगेन

विक्कीने त्याच्या आगामी चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनच्या कामाला सुरुवात होणार असल्याची बातमी काव्य स्वरुपात दिली आहे.  8 जून पासून सरदार उधम सिंह या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनला सुरुवात होत असल्याचे त्याने सांगितले आहे.

  • जानेवारी 2021 मध्ये प्रदर्शित होणार चित्रपट

सरदार उधम सिंग यांच्या जीवनावर बेतलेल्या या चित्रपटाची शूटिंग ऑक्टोबर 2019 मध्ये सुरू झाली होती. हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2020 रोजी प्रदर्शित करण्याचा विचार होता पण तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर हे काम पूर्ण होऊ शकले नाही, म्हणून आता हा चित्रपट 15 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शुजित सरकार असून रॉनी स्क्रूवाला यांनी निर्मिती केली आहे. एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक शुजित सरकार म्हणाले होते की - हा एक कठीण चित्रपट आहे, जो पोस्ट प्रोडक्शनमध्ये बराच काळ राहिल.

View this post on Instagram

2nd Oct 2020. #SardarUdham

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on Dec 26, 2019 at 11:11pm PST

  • अशी आहे चित्रपटाची कहाणी

13 एप्रिल 1919 रोजी जालियांवाला बाग हत्याकांडातील उधम सिंह हे प्रत्यक्षदर्शी होते. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या 21 वर्षांनंतर म्हणजे 13 मार्च 1940 रोजी सरदार उधम सिंह यांना या हत्याकांडाचा बदला घेण्याची संधी मिळाली होती. त्यांनी पंजाबचा गव्हर्नर जनरल राहिलेल्या मायकेल ओ ड्वायरला लंडनला जाऊन गोळ्या घालून ठार केले होते. 4 जून 1940 रोजी, उधम सिंह यांना या हत्येचा दोषी ठरवले गेले आणि 31 जुलै 1940 रोजी, त्यांना पेंटोनविले तुरुंगात फाशी देण्यात आली.

विक्कीच्या या पोस्टवर ‘उरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनीही चित्रपटाशी संबंधित एक गोष्ट शेअर केली आहे. आदित्यने लिहिले- 8 जून, परंतु 2018 रोजी 'उरी'च्या शूटिंगचा पहिला दिवस होता. शुभेच्छा माझ्या विक्की. मी प्रार्थना करतो की या चित्रपटासोबत तू सर्व रेकॉर्ड मोडित काढशील.   

बातम्या आणखी आहेत...