आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिना कैफने शेअर केला BTS व्हिडिओ:हॅलोविन फोटोशूटसाठी दिग्दर्शक बनला विकी कौशल, चाहते म्हणतात - बेस्ट हसबंड

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री कतरिना कैफचा 'फोनभूत' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या कतरिना या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक हॅलोविन पार्टी आयोजित केली होती, ज्याचा एक व्हिडिओ कतरिनाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडिओत ती कॅमेऱ्यासमोर अतरंगी लूकमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे. यादरम्यान पती विकी कौशल तिला तिचा सीन कसा शूट करायचा हे शिकवत आहे. व्हिडिओ शेअर करताना 'जेव्हा नवरा दिग्दर्शक बनतो,' असे कॅप्शन कतरिनाने दिले आहे. सोशल मीडिया यूजर्स कतरिना आणि विकीच्या या क्यूट व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, 'उफ सो क्यूट', तर दुसऱ्या यूजरने 'बेस्ट हसबंड' असे लिहिले.

कतरिनाने हॅलोवीनसाठी डीसी कॉमिकमधील हार्ले क्वीनचा लूक केला होता. हॅलोविन पार्टीसाठी तिने केलेल्या लूकचे फोटोदेखील कतरिनाने शेअर केले आहेत.

कतरिनाने शॉर्ट जीन्स आणि गुलाबी रंगाचा टॉप परिधान केला होता. कतरिनाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

काही चाहत्यांना मात्र कतरिनाचा हा लूक आवडलेला नाही. 'मला फोटो पाहून आकाशकंदील वाटला', अशी कमेंट एका नेटक-याने केली आहे.

कतरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास ती लवकरच ‘फोन भूत’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासह अभिनेता इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीही झळकणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...