आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविकी कौशल आणि कतरिनाने आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत होळी साजरी केली. त्यांच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये विकी त्याचे वडील शाम कौशल यांच्यासोबत पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ कतरिनाने रेकॉर्ड केला आहे.
वडील-मुलाची जोडी पाहून कतरिनाला हसू आवरले नाही
व्हिडिओमध्ये विकी आणि शाम कौशल पांढऱ्या पोशाखात दिसत आहेत. दोघांच्या कपड्यांवर आणि चेहऱ्यावर रंग आहे. तसेच दोघेही पंजाबी गाण्यांवर डान्स करत आहेत. वडील-मुलाची ही केमिस्ट्री स्वतः कतरिनाने रेकॉर्ड करत केली आहे. व्हिडिओमध्ये कतरनीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे, ती विकीला बेबी म्हणून हाक मारत आहे. विकी आणि शाम यांचा हा डान्स पाहून तिला हसू आवरता आलेले नाही.
विकीच्या वडिलांनी व्हिडिओ शेअर केला
हा व्हिडिओ शाम कौशल यांनी त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले- 'हॅप्पी होली. मी नृत्य शिकण्याचा प्रयत्न करत आहे. पिता-पुत्राच्या या जोडीवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.'
कतरिनाने दाखवली होळी सेलिब्रेशनची झलक
यापूर्वी कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर होळीचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती पती विकी आणि सासऱ्यासोबत दिसत होती. सर्वांचे चेहरे गुलालाने माखलेले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.