आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बायोपिक अपडेट:फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल, सॅम यांच्या 12 व्या पुण्यतिथीच्या दिवशी शेअर केला न्यू लूक 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सॅम चाळीस वर्षे भारतीय लष्करात कार्यरत होते

अभिनेता विकी कौशल पुन्हा एकदा इंडियन आर्मीतील शूर सैनिकाची भूमिका साकारत आहे. भारताचे आठवे लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित ‘सॅम’ या चित्रपटात तो प्रमुख भूमिका साकारत असून त्याचा नवा लूक अलीकडेच समोर आला आहे. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन विकीने आपला हा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडिओत सॅम माणेकशॉ यांची एक छोटीशी झलकही दाखवण्यात आली आहे. 

सॅम माणेकशॉ यांच्या 12 व्या पुण्यतिथीच्या दिवशी विकीचा हा लूक समोर आला आहे.  भारतीय लष्कराचा पोशाख, तोंडावरील स्मितहास्य, मिशा अशा लूकमध्ये विकी दिसतोय. चित्रपटातील काही भागांमध्ये 1971 सालच्या युद्धाचा काळ दर्शविला जाणार आहे

  • मागील वर्षी शेअर केला होता फर्स्ट लूक

विकीने मागील वर्षी सॅम माणेकशॉ यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी 'सॅम' चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. 'राजी' या गाजलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार 'सॅम' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून रॉनी स्क्रूवाला याचे निर्माते आहेत. विकी आणि मेघना यांनी यापूर्वी ‘राजी’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. याशिवाय विकी शहीद उधम सिंग यांच्या बायोपिकमध्येही दिसणार आहे.

  • शहीद उधम सिंगच्या पोस्ट प्रॉडक्शनला सुरुवात

विकीने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट शेअर करुन 'शहीद उधम सिंग' या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन सुरु झाल्याची माहिती दिली होती. 8 जून पासून याच्या पोस्ट प्रॉडक्शनला सुरुवात झाली असून हा चित्रपट 15 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...