आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकी-कॅट वेडिंग:सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणीसह अनेक सेलिब्रिटी लग्नात सहभागी होणार, कपलची गेस्ट लिस्ट तयार

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कबीर खानपासून ते करण जोहरपर्यंत या लग्नात सहभागी होणार आहेत

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ या डिसेंबरमध्ये तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. राजस्थानमधील जयपूरमधील सवाई माधोपूर येथील पॉश सिक्स सेंस लक्झरी हॉटेलमध्ये हा ग्रॅण्ड लग्नसोहळा होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, कतरिना आणि विक्की जे अद्याप त्यांच्या खास दिवसाबद्दल मौन बाळगून आहेत, त्यांनी अद्याप कोणालाही लग्नाचे अधिकृत आमंत्रण पाठवलेले नाही. मात्र, काही रिपोर्ट्सनुसार त्यांच्या गेस्ट लिस्टमध्ये बी टाऊनच्या अनेक लोकांचा समावेश आहे.

कबीर खानपासून ते करण जोहरपर्यंत या लग्नात सहभागी होणार आहेत
कतरिना तिच्या लग्नाच्या बातम्या लीक झाल्यामुळे थोडी नाराज असल्याचे वृत्त आहे. कतरिना आणि विकी यांनी इंडस्ट्रीतील अनेकांना 7 ते 9 डिसेंबरपर्यंत फ्री राहण्यास सांगितले आहे. काही
रिपोर्ट्सनुसार, दोघेही आपल्या इंडस्ट्रीतील मित्रांना लग्नात आमंत्रित करणार आहेत. अली अब्बास जफर, कबीर खान, करण जोहर, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, मिनी माथूर आणि रोहित शेट्टी
यांच्या नावांचा या यादीत समावेश आहे. याशिवाय वरुण धवन आणि नताशा दलालही लग्नाला उपस्थित राहू शकतात.

कतरिना कबीर खानच्या खूप जवळ आहे
रिपोर्ट्सनुसार, कतरिनाचा रोका सेरेमनी दिग्दर्शक कबीर खानच्या मुंबईतील घरात पार पडला. विकी आणि कतरिनाच्या कुटुंबातील सदस्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. कतरिना 'एक था
टायगर' फेम दिग्दर्शक कबीर खानच्या खूप जवळ आहे आणि त्यांच्याशी तिचे कौटुंबिक संबंध आहेत. यासोबतच कतरिनाने त्यांना राखीदेखील बांधते.

दिवाळीच्या दिवशी झाला होता कतरिनाचा रोका
विकी आणि कतरिनाच्या एका जवळच्या मित्राने खुलासा केला की, "हा सोहळा खूप सुंदर होता. रोषणाईने सजावट करण्यात आली होती आणि लेहेंग्यात कतरिना खूपच सुंदर दिसत होती. दिवाळीची
तारीख ही शुभ मुहूर्त असल्याने कुटुंबाने रोका सेरेमनी करण्याचा निर्णय घेतला होता. कबीर आणि मिनी यांनी अतिशय उत्तमरित्या हा समारंभ केला."

विकी आणि कतरिनाची टीम सवाई माधोपूरला पोहोचली आहे

रिपोर्ट्सनुसार, विकी आणि कतरिनाची टीम मंगळवारी राजस्थानमधील जयपूरमधील सवाई माधोपूर येथील पॉश सिक्स सेंस लक्झरी हॉटेलमध्ये हॉटेलची व्यवस्था पाहण्यासाठी पोहोचली होती. ही टीम विकीची एंट्री आणि मेहेंदी कार्यक्रमाची व्यवस्था यावर निर्णय घेईल. असे देखील सांगितले जात आहे की, हॉटेल 7-12 डिसेंबरसाठी बुक केले आहे आणि अनेक इव्हेंट कंपन्यांना ते हाताळण्यासाठी टीम तयार करण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...