आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकी-कॅट वेडिंग:अंबानींच्या पावलावर विकी कौशल - कतरिना कैफ यांचे पाऊल, लग्नाच्या सिक्रेसीसाठी 'डिजिटल मीडिया सिक्युरिटी स्टिकर्स'चा करत आहेत वापरत

अजित रेडेकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलाच्या लग्नात अंबानींनी या पद्धतीचा केला होता अवलंब

विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जोडप्याचा हळदी समारंभ झाला आणि त्यानंतर पार्टी होणार आहे. 9 डिसेंबरला दुपारी सेहरा बंदीच्या सोहळ्यानंतर कतरिना आणि विकी सप्तपदी घेतील. या शाही विवाहाची गुप्तता राखण्यासाठी लग्नाला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला झिरो मोबाईल पॉलिसी अवलंबावी लागणार आहे.

लग्नादरम्यान कोणत्याही पाहुण्याला आतमध्ये मोबाइल फोन ठेवण्याची परवानगी नाही. दरम्यान, एखाद्याला काही महत्त्वाच्या कामासाठी आपला मोबाइल घ्यायचा असेल, तर त्याच्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात 'डिजिटल मीडिया सिक्युरिटी स्टिकर' लावण्यात येत आहे. असे केल्याने ते आतमध्ये कोणत्याही प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ काढू शकणार नाहीत. सूत्रांनुसार, जर कोणी हे स्टिकर काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

मुलाच्या लग्नात अंबानींनी या पद्धतीचा केला होता अवलंब

यापूर्वी मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीच्या लग्नात या तंत्राचा वापर करण्यात आला होता. असे म्हटले जाते की, आजही जेव्हा कोणी अंबानींच्या घरात जातात तेव्हा त्यांना मोबाईल स्टिकर्सचा प्रोटोकॉल पाळावा लागतो.

बातम्या आणखी आहेत...