आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविकी कौशल आणि कतरिना कैफ गुरुवारी म्हणजेच 9 डिसेंबरला राजस्थानच्या सिक्स सेन्से फोर्टमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, लग्नानंतर लगेचच दोघेही हनिमूनला जाणार नसल्याच्या बातम्या येत आहेत. लग्नानंतर कतरिना तिच्या 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विकी कौशलही दिग्दर्शक दिनेश विजानच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असणार आहे. त्यामुळे त्यांचा हनीमून पुढे ढकलला जाऊ शकतो.
कतरिना 15 डिसेंबरपासून मुंबईत 'मेरी ख्रिसमस'चे शूटिंग सुरू करणार आहे रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ लग्नानंतर लवकरच साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत 15 डिसेंबरपासून दिग्दर्शक श्रीराम राघवनच्या 'मेरी ख्रिसमस'साठी मुंबईत शूटिंग सुरू करणार आहे. रमेश तौरानी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. कतरिनाने तिच्या तारखा चित्रपट निर्मात्यांना आधीच दिल्या होत्या. कतरिना आणि विजय पहिले भारतात शूटिंग पूर्ण करतील, त्यानंतर चित्रपटाचे आऊटडोअर शेड्यूल असेल.
काम संपवून विकी-कतरिना हनीमूनसाठी मालदीवला जाणार आहेत
कतरिना अतिशय प्रोफेशनल आहे आणि 'मेरी ख्रिसमस'साठी शूट करण्याचा निर्णय तिचा आहे. त्याचबरोबर विकी कौशलने रमेश तौरानी यांना चित्रपटासाठी तारखा दिल्या आहेत. दोघेही आपले चित्रपटवेळेत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. अशा परिस्थितीत दोघांनाही लग्नानंतर लगेचच हनिमूनला जाणे अवघड जात आहे. आपापली कामे उरकूनच दोघे हनिमूनला जाणार आहेत. असे सांगितले जात आहे की काम संपल्यानंतर दोघेही हनीमूनसाठी मालदीवला जाऊ शकतात, जिथे ते काही दिवसांच्या सुट्टीवर असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.