आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकी कौशलची मावस बहीण म्हणाली:विकी कतरिना कैफशी लग्न करत नाहीये, या बातम्या केवळ अफवा आहेत

अमित कर्ण10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कौशल कुटुंबाचे नातेवाईकही औपचारिक घोषणेची वाट पाहत आहेत, अद्याप कोणालाच याबाबत अधिकृत माहिती नाही
  • नातेवाइकांना गुप्तता राखण्यासाठी दिलेले हे निर्देश असू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या तयारीच्या बातम्या सर्वत्र पसरल्या आहेत, मात्र केवळ त्यांच्या नातेवाईकांनाच या लग्नाची अधिकृत माहिती नाही की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विकी कौशलची मावस बहीण डॉ. उपासना वोहरा हिने दैनिक भास्करशी केलेल्या खास बातचीतमध्ये दोघांचेही लग्न होत नसल्याचा दावा केला आहे. तिचा भाऊ विकी कौशल कतरिना कैफसोबत लग्न करत नसल्याचे तिने स्पष्टपणे सांगितले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या या केवळ अफवा असल्याचे तिचे म्हणणे आहे.

भावाशी बोलले, तसे काही नाही
उपासना म्हणाली, 'लग्नाच्या तारखांपासून ते तयारीपर्यंत मीडियामध्ये फक्त अफवा पसरवल्या जात आहेत. लग्न होत नाहीये. असे काही घडले तर ते जाहीर करतील. बॉलिवूडमध्ये अनेकदा अफवा येतात आणि नंतर कळते की प्रकरण काही वेगळेच होते. ते फक्त तात्पुरत्या अफवा असतात. अलीकडेच मी माझ्या भावाशी बोलले. पण तसे काही नाही. बाकी मला या विषयावर अधिक भाष्य करायचे नाही, पण सध्या तरी लग्न होत नाहीये,' असे उपासनाने स्पष्ट केले आहे.

सीक्रेसीसाठी उचलली पावले
डॉ. उपासना वोहराचे लग्न याच वर्षी जुलैमध्ये झाले होते. त्यावेळी विकी कौशलने त्याच्या भावासोबत उपासना वोहराच्या लग्नाला हजेरी लावली होती. बॉलिवूड इंडस्ट्रीतील जाणकारांच्या मते, उपासनाने जे आता सांगितले आहे, ते विकी आणि कतरिनाने कुटुंबातील सदस्यांना गुप्तता राखण्यासाठी दिलेले निर्देश असू शकतात.

नो फोन पॉलिसी देखील लागू केली जाणार
विकी-कतरिनाच्या लग्नाबाबत अशीही बातमी आली होती की, त्यांनी लग्नाच्या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांसाठी नो फोन पॉलिसी लागू केली आहे. त्याचबरोबर या कपलने 100 ऐवजी 150 सुरक्षा रक्षकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असून त्यात महिला अंगरक्षक, पुरुष अंगरक्षक, सुरक्षा रक्षक याशिवाय ट्रॅफिक रेग्युलेशन, सेलिब्रिटीज एक्सेससारख्या सेवांचा समावेश आहे.

विकी आणि कतरिना कैफ 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान कधीतरी लग्न करणार आहेत, ज्यासाठी या कपलने राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे सिक्स सेंस फोर्ट हॉटेल बुक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...