आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी छाप उमटवणारा अभिनेता विकी कौशल आता ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशल लवकरच मोठ्या पडद्यावर छत्रपची संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे शंभूराजांच्या पराक्रमावर त्यांच्या त्यागावर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत आणि यात मुख्य भूमिकेत विकीची वर्णी लागली आहे.
'उरी' चित्रपटानंतर विकी कौशल हा लक्ष्मण उतेकरांची या भूमिकेसाठी पहिली पसंती होती आणि त्यांनी विकीला चित्रपटासाठी विचारणा केली. विकीलाही चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली आणि त्याने भूमिकेसाठी होकार दिला. तर बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान चित्रपटात महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. या प्रोजेक्टसाठी उतेकर यांनी काम सुरू केले असून चित्रपटाची कथा लिहून तयार आहे. चित्रपटाचे प्री प्रोडक्शन सुरू झाले आहे आणि लवकरच चित्रीकरणालाही सुरुवात होईल.
'तख्त' आणि 'इमोर्टल अश्वत्थामा' या चित्रपटांनंतर विकीने या एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘दिनेश व्हिजन्स’तर्फे करण्यात येणार आहे.
लक्ष्मण उतेकर यांना 'मिमी' आणि 'लुका छुपी' या चित्रपटांसाठी ओळखले जाते. त्यांनी बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता या चित्रपटाच्या रूपात त्यांनी मोठं शिवधनुष्य पेलले आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असणार आह. चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
आगामी सॅम बहादूर चित्रपटामुळे चर्चेत आहे विकी
विकी लवकरच 'सॅम बहादूर' या चित्रपटात झळकणार आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मेघना गुलजार यांनी सॅम बहादूर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात विकी कौशल सॅम माणेकशॉच्या भूमिकेत दिसणार आहे, तर सान्या मल्होत्रा सॅमच्या पत्नी सीलू माणेकशॉच्या भूमिकेत दिसणार आहे. रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.