आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगली बातमी:आलिया भट्टनंतर विकी कौशलची कोरोनावर यशस्वी मात, फोटो शेअर करुन लिहिले - निगेटिव्ह

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 दिवसांपूर्वी विकीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. स्वतःचा एक हसरा फोटो शेअर करुन विकीने ही चांगली बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये त्याने 'निगेटिव्ह' असे लिहिले आहे. 10 दिवसांपूर्वी विकीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर 24 तासांतच त्याची कथित गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. विकी आता बरा झाला आहे, मात्र कतरिनाचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही.

विक्कीने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रार्थनांसाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. विक्कीने लिहिले - 'आज टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला. आपणा सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. जे लोक बरे होत आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो.'

भूमी पेडणेकरलाही झाली होती कोरोनाची लागण

10 दिवसांपूर्वी विकी कौशल करण जोहरच्या आगामी 'मिस्टर लेले' या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता, त्याच काळात त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच वेळी विकीची को-स्टार भूमी पेडणेकर हिलादेखील कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली होती. विकी आणि भूमीच्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबले आहे. हा चित्रपट शशांक खेतान दिग्दर्शित करत आहेत.

विकीच्या आगामी चित्रपटांविषयी सांगायचे म्हणजे, तो इम्मॉर्टल अश्वतथामा आणि सॅम मानेक शॉच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...