आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठरलं तर...:विकी कौशल स्टारर 'सरदार उधम' चित्रपटाचा ऑक्टोबर महिन्यात होणार वर्ल्ड वाइड प्रीमिअर, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार भेटीला

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘सरदार उधम’ हा चित्रपट 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलचा आगामी चित्रपट 'सरदार उधम'च्या वर्ल्ड प्रीमिअरची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण सध्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

'सरदार उधम' ही एका असाधारण युवकाची न सांगितली गेलेली कहाणी आहे, ज्याने आपल्या मातृभूमी आणि इथल्या लोकांविषयी असलेल्या प्रेमाखातर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामासाठी आपले जीवन समर्पित करण्यासाठी प्रेरित केले. विकी कौशल स्टारर 'सरदार उधम' या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजीत सरकार यांनी केले असून रोनी लाहिरी व शील कुमार याचे निर्माते आहेत. हा चित्रपट भारत आणि जगभरातील 240 देशातील प्राइम सदस्य या ऑक्टोबर महिन्यात अमेझॉन प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट पाहू शकतात.

‘सरदार उधम’ हा चित्रपट 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे. त्यावेळी जालियनवाला बाग येथे भरलेल्या शांतता सभेत गोळीबार करण्याचे आदेश देणाऱ्या मायकेल ओ’डॉयरची हत्या उधम सिंग यांनी केली होती. उधम सिंग हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...